ETV Bharat / city

शरद पवार अन् आशिष शेलार संयुक्तपणे रिंगणात; मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक - मुंबई क्रिकेट असोसिएशन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी अखेर हात मिळवणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आगामी निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार यांनी संयुक्तपणे आपले पॅनेल उभे केले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक
author img

By

Published : Oct 10, 2022, 5:25 PM IST

Updated : Oct 10, 2022, 7:09 PM IST

मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत मुंबईचे भाजपा अध्यक्ष एडवोकेट आशिष शेलार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आशिष शेलार यांनी यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक
मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणुक

शेलार-पवार भेट - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवडून यावे यासाठी आशिष शेलार यांनी आज सोमवार (दि. 10 ऑक्टोबर)रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शरद पवार यांना शेलार यांनी मदतीचे आवाहन केले. तसेच, शरद पवार आणि शेलार यांनी मिळून संयुक्तपणे पॅनल या निवडणुकीत उभे केले आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपाध्यक्ष पदासाठी उपाध्यक्ष पदासाठी अमोल काळे सचिव पदासाठी अजिंक्य नाईक सहसचिव पदासाठी दीपक पाटील आणि खजिनदार पदासाठी अरमान मलिक निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. सदस्य पदासाठी जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, खोदादाद येजगिरी, गौरव पराडे, निलेश सामंत, दिपेन मिस्त्री असणार आहेत. तर मुंबई प्रीमियर लीग टी-ट्वेंटी साठी अध्यक्ष म्हणून विहंग सरनाईक आणि उपाध्यक्ष पदासाठी गणेश अय्यर यांना या संयुक्त पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे.

Last Updated : Oct 10, 2022, 7:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.