मुंबई - जगभरात पसरणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर दुबईसह युएई येथून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करून आणि ७ दिवस सक्तीने क्वारंटाईन व्हावे लागत होते. आता दुबईसह युएई येथून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करून आणि ७ दिवस सक्तीच्या विलगीकरणातून सुटका मिळाली आहे. तसे परिपत्रक मुंबई महापालिकेने काढले आहे. याआधी युएई मधील दुबई देशातून येणाऱ्या प्रवाशांना ७ क्वारंटाईन केले जात होते.
क्वारंटाईन मधून सुटका -
जगभरात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढत आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून आलेले प्रवासी ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून येत आहेत. या आधी युरोप, युके, साऊथ आफ्रिका आदी हाय रिक्स देशातून मुंबई विमान तळावर येणाऱ्या प्रवाशांपैकी काही प्रवासी ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. युरोप, युके, साऊथ आफ्रिका आदी देशातून येणाऱ्या प्रवाशांना क्वारेंटाईन केले जात असल्याने दुबई मार्गे प्रवासी येऊ लागले. दुबई मार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या असता पॉजिटीव्ह प्रवासी आढळून आले. यामुळे पालिकेने दुबई येथून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस क्वारंटाईन सक्तीचे केले होते. आता पालिकेने या नियमात सुधारणा केली आहे. नव्या नियमानुसार दुबईसह युएई येथून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करून आणि ७ दिवस सक्ती नसणार आहे. इतर हाय रिस्क देशातील प्रवाशाप्रमाणे दुबईसह युएई येथून आलेल्या प्रवाशांना नियम लागू असतील. याची अंमलबजावणी १७ जानेवारीपासून केली जाणार आहे.
भारत सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिनांक 07.01.2022 रोजी जारी केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्वानुसार शहरात कोविड-19 च्या ओमिक्रॉन प्रकाराचा प्रसार रोखण्यासाठी, मुंबईत दुबईसह संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या देखरेखीसाठी विशेष मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार, अशा प्रवाशांसाठी ७ दिवस होम क्वारंटाईन आणि RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. हे निर्देश आता खालीलप्रमाणे सुधारित केले आहेत:दुबईसह संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून येणाऱ्या प्रवाशांसाठी यापुढे कोणतेही विशेष SOP लागू होणार नाहीत. दुबईसह संयुक्त अरब अमिराती (UAE) मधून येणार्या प्रवाश्यांना "जोखीम असलेल्या देशांव्यतिरिक्त इतर देश" मधून येणार्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातील. हे निर्देश 17 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू केले जातील