ETV Bharat / city

Share Market : आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार गडगडला! सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण!

आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात(Share Market) मोठी घसरण बघायला मिळाली. सोमवारी शेअर बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्समध्ये(Sensex) एक हजार अंकांची घसरण बघायला मिळाली. एक हजार अंकांनी घसरून सेन्सेक्स 58,572 अंकांच्या पातळीवर आला होता. जागतिक बाजारातील(World Share Market) मंदीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स,(Reliance) कोटक,(Kotak) बजाज फायनान्स(Bajaj Finance) अशा मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली.

Share Market : आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार गडगडला! सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण!
Share Market : आठवड्याच्या सुरूवातीला शेअर बाजार गडगडला! सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण!
author img

By

Published : Nov 22, 2021, 1:31 PM IST

Updated : Nov 22, 2021, 1:48 PM IST

मुंबई : आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात(Share Market) मोठी घसरण बघायला मिळाली. सोमवारी शेअर बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्समध्ये(Sensex) एक हजार अंकांची घसरण बघायला मिळाली. एक हजार अंकांनी घसरून सेन्सेक्स 58,572 अंकांच्या पातळीवर आला होता. जागतिक बाजारातील(World Share Market) मंदीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स,(Reliance) कोटक,(Kotak) बजाज फायनान्स(Bajaj Finance) अशा मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली.

निफ्टीतही घसरण

सेन्सेक्ससह निफ्टीतही बाजाराच्या सुरूवातीला 129.85 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17,634 अंकांवर घसरला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये चार टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. रिलायन्सकडून तेल रिफायनरीतील 20 टक्के भागभांडवलाची सौदी अरामकोला 15 अब्ज डॉलर्सना विक्री केली जाणार आहे. याचा रिलायन्सच्या शेअरला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. याशिवाय मारुती, बजाज फायनान्स, कोटक बँक, बजाज फिनसर्व्हचे शेअरही घसरले. दुसरीकडे भारती एअरटेल, पॉवरग्रिड, एशियन पेंटस्, इंडसइंड बँक, आयटीसीचे शेअर मात्र वधारले. भारती एअरटेलचे शेअर सहा टक्क्यांनी वधारले.

भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात शेअर विक्रीचे धोरण स्वीकारल्याने शेअर बाजार गडगडल्याचे चित्र दिसून आले.

पेटीएमकडून निराशा सुरूच

पेटीएमकडून गुंतवणुकदारांची निराशा सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिली. पेटीएमचे शेअर सलग दुसऱ्या दिवशी चौदा टक्क्यांनी घसरले. पेटीएमचे बीएसईमधील शेअर 13.66 टक्क्यांनी घसरून 1350 रुपयांवर आले. तर एनएसईमधील शेअरही 13.39 टक्क्यांनी घसरून 1351 रुपयांवर आले.

Last Updated : Nov 22, 2021, 1:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.