मुंबई - राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीचे रक्षक असाल तर राज्याचं अधिवेशन (Sudhir Mungantiwar on Assembly Winter Session 2021) एका आठवड्याने वाढवलं पाहिजे, (Maharashtra Assembly Winter Session 2021) अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे नागपूरला येणार नाहीत (Uddhav Thackeray absence in Assembly Session) म्हणून हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आले मात्र मुख्यमंत्री अधिवेशनात आले नाहीत.आम्ही सांगू तेच धोरण, आम्ही बांधू तेच तोरण, हे जे काही चालले आहे ते चुकीच आहे. डॉक्टर सांगतात कोरोना आहे म्हणून मी दवाखान्यात जाणार नाही असं चालतं का? अशाने प्रश्न सुटणार आहेत का? असे प्रश्नही सुधीर मुनगंटीवार (Senior BJP leader Sudhir Mungantiwar) यांनी उपस्थित केले.
प्रश्न - अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी तुमची मागणी सरकारने अमान्य केली. लोकशाहीचे रक्षकच आता भक्षक झाले आहेत असे तुम्ही म्हणता?
उत्तर - २८ नोव्हेंबर २०१९ हा जनतेचा विश्वासघात करणारा दिवस ठरला. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले असताना हिंदुत्वाचे धर्मांतर करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. अधिवेशनात सर्व आयुधं वापरून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या अधिवेशनात इतके प्रश्न आहेत, इथे प्रश्न सोडवण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा अशी आमची इच्छा होती. आमच्या घरी काही खुर्च्या नाहीत म्हणून आम्ही तिथे बसायला येतोय अशातला भाग नाही. आम्ही सांगू तेच धोरण, आम्ही बांधू तेच तोरण, हे जे काही चालले आहे ते चुकीच आहे. डॉक्टर सांगतात कोरोना आहे म्हणून मी दवाखान्यात जाणार नाही असं चालतं का? अशाने प्रश्न सुटणार आहेत का? कोरोना मध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. स्पेशल वॉर रूम तयार करायचे आहेत. लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू ठेवायची आहे. कोरोनाची भीती दाखवून अधिवेशन घ्यायचे नाही असा या सरकारचा पवित्रा आहे. ससा पेक्षाही भेकड हे सरकार आहे. कोरोनावर एक दिवस विशेष अधिवेशन बोलवावे ही आमची मागणी आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर या अधिवेशनाचा कालावधी वाढवायला हवा होता.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी खास बातचीत प्रश्न- या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री अनुपस्थित राहिल्याने बऱ्याच चर्चा झाल्या. वास्तविक त्यांची तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही मुंबईमध्ये अधिवेशन घेण्यास परवानगी दिली. त्याच बरोबर हे अधिवेशन नागपूरला घ्यायला हवे अशी काँग्रेसच्या नेत्यांचीही मागणी होती. तरीही हे अधिवेशन मुंबईमध्ये झाले, कसे बघता याला? उत्तर - मागच्या वर्षी कोरोनाचं कारण सांगून हे अधिवेशन मुंबईत घेतलं. यंदा मुख्यमंत्री आजारी आहेत त्यांना ट्रेन व हेलिकॉप्टरने अधिवेशनाला नागपूर येथे हजर राहता येणार नाही म्हणून मुंबई मध्ये अधिवेशन घेण्याचे ठरले. ते अधिवेशनाला येतील अशी अपेक्षा होती पण ते आलेच नाहीत. जर मुख्यमंत्री येणारच नव्हते, तर अधिवेशन नागपुरात घेतले असते. शेवटी अधिवेशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे. अशाने आमचा विश्वासघात केला गेला असं मला वाटतं. ही आमची फसवणूक आहे. हे अधिवेशन नागपूरलाच व्हायला पाहिजे होतं.
प्रश्न - सध्या अधिवेशनामध्ये जे काही प्रकार चालू आहेत. पंतप्रधान यांची नक्कल करणे, टोमणे मारणे त्याने विधान भवनाची पवित्रता खाली जात आहे, असे तुम्हाला वाटत नाही का?
उत्तर - १६ मार्च १९९५ ला मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यानंतर अनेक अधिवेशन पाहिली आहेत. अनेक अधिवेशनामध्ये प्रश्न- उत्तर पाहिली आहेत. परंतु ज्या पद्धतीने माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, बाबासाहेब कुपेकर, दत्ताजी नलावडे त्याचबरोबर हरिभाऊ बागडे असतील यांची आज आठवण येते. हे अध्यक्ष असताना ज्या पद्धतीने अधिवेशन चालायचे, ज्या पद्धतीने निर्णय प्रक्रिया व्हायची ती आजही स्मरणात आहे. आजच्या तारखेला लोकशाही संपवण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. फक्त आरोप करायचे व भ्रष्टाचार लपवायचे असा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही. आपण केलेला भ्रष्टाचार किती तर्कहीन आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, हे अतिशय अयोग्य आहे.
प्रश्न - यंदा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत असताना सर्वच नियमांची पायमल्ली केली गेली आहे?
उत्तर - विधानसभा अध्यक्ष यांची (Election of Assembly Speaker) निवड ही पूर्वीपासून गुप्त मतदानाने होत आली आहे. नवीन धोरण आणून चुकीचं काम हे सरकार करत आहे. यंदा आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्याला आमचा नेहमीच विरोध असणार आहे. वास्तविक यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे, याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. हे सरकार पूर्णतः बेईमानी करत आहे. आतापर्यंतचे सर्वात बेईमान सरकार अशी इतिहासामध्ये याची नोंद होईल.
प्रश्न- मुख्यमंत्री आजारी आहेत ते या अधिवेशनात अनुपस्थित राहिले. त्यांनी आपला कार्यभार इतरांकडे द्यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का?
उत्तर - या मुख्यमंत्र्यांचा आपल्या (Uddhav Thackeray absence in Assembly Session )आमदारांवरच विश्वास नाही. हे मुख्यमंत्री आपल्या आमदारांवर अविश्वास दाखवतात म्हणून तर त्यांनी विधानसभा अध्यक्ष यांची निवड ही आवाजी मतदानाने घेण्याचे ठरवले आहे. असे मुख्यमंत्री इतरांवर काय विश्वास टाकू शकतात? दुसऱ्याच्या मार्कशीटवर आपल नाव लिहून ती मार्कशीट आपली आहे असे दाखवण्याचे काम हे सरकार करत आहे.