ETV Bharat / city

क्षय कुष्ठरोगासंदर्भात मुंबईत तपासणी होणार, ४० लाख ३४ हजार लोकांची महापालिका करणार आरोग्य तपासणी - कुष्ठरोगाची लक्षणे

मुंबईतील ४० लाख ३४ हजार लोकांची तपासणी होणार आहे. क्षय कुष्ठरोगासंदर्भात मुंबईत तपासणी होणार आहे. महापालिका ही तपासणी करणार आहे. २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान ९ लाख ८६ हजार घरांतील ४० लाख ३४ हजार लोकांची तपासणी करणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

क्षय कुष्ठरोगासंदर्भात मुंबईत तपासणी होणार

author img

By

Published : Sep 24, 2022, 4:01 PM IST

Updated : Sep 24, 2022, 7:58 PM IST

मुंबई - क्षयरोग व कुष्ठरोगाचे वेळीच निदान व उपचार करण्यासाठी मुंबई महापालिकेने क्षयरोग व कुष्ठरोग रुग्णांची शोध मोहम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान ९ लाख ८६ हजार घरांतील ४० लाख ३४ हजार लोकांची तपासणी करणार असल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

९ लाख ८६ हजार घरांना भेटी - भारत सरकारने दिलेल्या उद्दिष्टांनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात सन २०२५ पर्यंत क्षयरोग तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम’ (Active Case Finding / ACS) आणि कुष्ठरोग शोध अभियान (Leprosy Case Detection Campaign / LCDC) राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान साधारणपणे ९ लाख ८६ हजार घरांमधील ४० लाख ३४ हजार ५१३ इतक्या लोकसंख्येची तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे केली जाणार आहे. यासाठी २ हजार ८२९ टीम कार्यरत राहणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत घरोघरी देणार आहेत. प्रत्येक टीममध्ये एक महिला, एक आरोग्य स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक अशा ३ व्यक्तींचा समावेश असणार आहे. यावेळी एखाद्या घरातील कोणताही सदस्य उपलब्ध नसल्यास, सदर टीम त्या घराला घरातील सदस्यांच्या उपलब्धतेनुसार पुन्हा भेट देणार आहे. उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा पुरी यांनी ही माहिती दिली.

क्षयरोगाची लक्षणे - १४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, संध्याकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. प्राथमिक तपासणी दरम्यान आढळलेल्या अशा क्षयरोग संशयितांच्या थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी नियुक्त केंद्रांद्वारे मोफत केली जाणार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान नव्याने आढळलेल्या रूग्णांची नोंदणी केली जाईल. अशा रुग्णांना त्यांच्या नजिकची महानगरपालिका आरोग्य केंद्रे, दवाखाने अथवा रुग्णालयांमध्ये पुढील तपासणी करण्यासह उपचार देखील मोफत दिले जाणार आहेत. ज्या कुटुंबातील सदस्यांना सक्रिय क्षयरोगाचा त्रास आहे किंवा क्षयरोगाचा कोणताही पूर्व इतिहास आहे, अशा कुटुंबांनी कुटुंबातील इतर निरोगी सदस्यांमधील क्षयरोगाच्या लक्षणांबद्दल अत्यंत दक्ष व सजग राहणे आवश्यक आहे. तसेच अशी लक्षणे जाणवल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा सरकारी आरोग्य सुविधांच्या स्तरावर लवकरात लवकर सल्ला घेऊन त्यानुसार औषधोपचार करणे आवश्यक आहे, असेही डॉ. पुरी यांनी सांगितले.

कुष्ठरोगाची लक्षणे - महानगरपालिकेतील कुष्ठरोग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमिता पेडणेकर यांनी माहिती दिली की, कुष्ठरोग बाधित रुग्णांच्या त्वचेवर फिकट किंवा लालसर बधीर चट्टा अगर चट्टे येणे, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे; तसेच तळहातावर वा तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे यासारखी लक्षणे आढळून येतात. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकांद्वारे निदान झालेल्या कुष्ठरोगाच्या संशयितांना महापालिका किंवा सरकारी आरोग्य सुविधांकडे संदर्भित करण्यात येईल व सदर कुष्ठरोग संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिका-यांमार्फत करण्यात येईल, असेही डॉ. पेडणेकर यांनी सांगितले.

Last Updated : Sep 24, 2022, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.