ETV Bharat / city

काळी मांजरे, कोल्हे, लांडगे कितीही आले तरी वाघासमोर काही चालते का - संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, की गेल्या 50 वर्षात अनेक बाप निर्माण झाले. दिल्लीतून अनेक लोक आले. पण कोणाच्या बापाला जमले नाही. महानगरपालिकाच्या पालिकेच्या मुख्यालयातून सेनेचा झेंडा उतरवणे शक्यही होणार नाही.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Nov 20, 2021, 10:27 PM IST

Updated : Nov 20, 2021, 10:41 PM IST

मुंबई - काळी मांजरे, कोल्हे लांडगे किती आले पण, वाघासमोर काही चालते का ? कितीही प्रयत्न केले तरी शिवसेनेचा झेंडा महानगरपालिकेवरून उतरवणे शक्य होणार नाही असा टोला संजय राऊत यांनी भाजपला (Sanjay Raut Slammed BJP in Vikroli) लगावला आहे. ते विक्रोळीतील एका कार्यक्रमात बोलत होते.

मुंबईतील आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. विक्रोळीतील छत्रपती संभाजी महाराज मैदानाचा लोकापर्ण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटींग करत विरोधकांचा समाचार घेतला आहे.

काळी मांजरे, कोल्हे, लांडगे कितीही आले तरी वाघासमोर काही चालते का

हेही वाचा-Swachh Survekshan 2021 : सलग पाचव्यांदा 'इंदूर' नंबर वन, महाराष्ट्रातील दोन शहरे पहिल्या पाचमध्ये

किती पण डोके आपटले, तरी काही फायदा नाही- संजय राऊत-

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, की सामाजिक कार्यामुळे शिवसेना उभी आहे. काळी मांजरे, कोल्हे लांडगे किती आले? पण, वाघासमोर काही चालते का ? 50 वर्षात यांची कोणाची पर्वा केली नाही. मग आता कशाला करायची? ईशान्य मुबंई शिवसेनेची भिंत आहे. किती पण डोके आपटले, तरी काही फायदा नाही, असा टोलादेखील त्यांनी विरोधकांना दिला. हे सरकार आपले आहे. हे ठाकरे सरकार आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.

हेही वाचा-Tmc mp Mahua Moitra - मुख्यमंत्री सावंत यांच्या अनधिकृत खाणीची सीबीआय चौकशी व्हावी - महुआ मोइत्रा

कोणाच्या बापाला जमले नाही

पुढे संजय राऊत म्हणाले, की गेल्या 50 वर्षात अनेक बाप निर्माण झाले. दिल्लीतून अनेक लोक आले. पण कोणाच्या बापाला जमले नाही. महानगरपालिकाच्या पालिकेच्या मुख्यालयातून सेनेचा झेंडा उतरवणे (Shivsena power in BMC) शक्यही होणार नाही. शिवसेनेचा नगरसेवक हा (corporators of Shivsena in BMC) लोकसेवक असतो, असे खासदार संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा-नाशिक : डॉक्टर वधूची होणार कौमार्य चाचणी? अंनिसची त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार

Last Updated : Nov 20, 2021, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.