मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर 8 ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. आज त्यांना ईडी कार्यालयात मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. त्यावेळी त्यांनी वर्षा राऊत यांना ( ED Summons to Varsha Raut ) आलेल्या समन्ससंदर्भात विचारण्यात आले. तेव्हा ते, आने दो, आने दो सबको आने दो! म्हणाले. संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) हे ईडी कार्यालयात गेले. शिवसेना नेते संजय राऊत यांची वैद्यकीय चाचणी जे जे रुग्णालयात ( J J Hospital ) केल्यानंतर पुन्हा ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली. संजय राऊत यांना विचारण्यात आले की, वर्षा राऊत यांनादेखील चौकशीकरिता ईडीने बोलवले आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
वर्षा राऊत यांना ईडीचे समन्स : पत्राचाळ प्रकरणात आता ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स (ED Summons Varsha Raut) पाठवले आहे. चार दिवसांपूर्वी ईडीने याच प्रकणात संजय राऊतांना अटक केली होती (Sanjay Raut Arrested). पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांच्या खात्यावरील व्यवहार उघडकीस आल्यानंतर त्यांना ईडीने हे समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यामुळे आता त्यांना ईडी समोर हजर राहून त्यांची बाजू मांडावी लागेल. वर्षा राऊत यांना उद्या (5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश समन्सद्वारे देण्यात आले आहेत.
वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून मोठा व्यव्हार - ईडीच्या वकिलांनी गुरुवारी न्यायालयात वर्षा राऊत यांचा आर्थिक गैरव्यवहारात सहभाग असल्यासंदर्भात भाष्य केले होते. ईडीने राऊत यांच्या घरावर छापे टाकले तेव्हा काही कागदपत्रे सापडली होती. त्यानंतर संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यातून काही व्यक्तींना रक्कम पाठवली गेली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आज ईडीने वर्षा राऊत यांना समन्स पाठवले आहे.
संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी - शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना आज कोर्टासमोर हजर ( Sanjay Raut case hearing ) केले असता पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी ( Sanjay Raut Ed custody) देण्यात आली आहे. गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यामुळे आणखी संजय राऊत यांचा मुक्काम ईडी कोठडीत वाढला आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? - पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला.
ईडी आज चौकशी करणार : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे आता चार दिवसांत ईडीला संजय राऊत यांच्याविरोधात प्रबळ पुरावे गोळा करावे लागणार आहेत. संजय राऊत आठ दिवसांची रिमांड मिळावी, अशी मागणी ईडीने केली होती. तर संजय राऊत यांच्याकडे सर्व पैसा हा वैध मार्गांने आला आहे. त्यांच्यावर खोटी केस दाखल करण्यात आली आहे. तसेच संजय राऊत हे हार्ट पेशंट आहेत. त्यामुळे त्यांना कमी दिवसांची रिमांड द्यावी, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली होती. संजय राऊत हे हार्ट पेशंट असल्याने रात्री साडे दहा वाजल्यानंतर त्यांची चौकशी करणार नाही, असे ईडीने न्यायालयाला सांगितले असल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी ईटीव्ही भारताला सांगितले आहे.
हेही वाचा : congress agitation : महागाईच्या विरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन सुरू