ETV Bharat / city

Sanjay Raut on Agnipath scheme : गुलामांना ठेकेदारी पद्धतीवर कामावर घेतलं जाऊ शकतं, सैनिकांना नाही! - संजय राऊत - सैन्य भरती संजय राऊत प्रतिक्रिया

केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली नवीन 'अग्निपथ' योजनेला ( Sanjay Raut on Agnipath scheme ) देशभरातून कडाडून विरोध केला जातोय. या योजनेवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी देखील केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ठेकेदारी पद्धतीवर गुलामांना ( Agnipath scheme news ) आणि फार फार तर सध्याच्या मीडियाला कामावर ठेवले जाऊ शकते, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on Agnipath scheme
सैन्य भरती संजय राऊत प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 18, 2022, 11:43 AM IST

मुंबई - केंद्र सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली नवीन 'अग्निपथ' योजनेला ( Sanjay Raut on Agnipath scheme ) देशभरातून कडाडून विरोध केला जातोय. या योजनेवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी देखील केंद्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ठेकेदारी पद्धतीवर गुलामांना ( Agnipath scheme news ) आणि फार फार तर सध्याच्या मीडियाला कामावर ठेवले जाऊ शकते. मात्र, सैनिकांना ठेकेदारी पद्धतीवर कामावर ठेवले जाऊ शकत नाही. कंत्राटी पद्धतीने सैन्यभरती केली तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा - MLC Election 2022 : मतफुटीच्या भीतीने सेना आमदारांचा हॉटेलमध्ये मुक्काम

ठेकेदारी पद्धतीवर नोकरी म्हणून सैनिकांना केवळ चार वर्षे नोकरीवर ठेवणे हा सैन्यदलाचा अपमान आहे. याआधीही मोदी सरकारने देशातील तरुणांना नोकरी देण्यासंबंधात अनेक आश्वासने दिलीत. मात्र मोदी सरकारची प्रत्येक योजना फसलेली दिसते. आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी ही टीका केंद्र सरकारवर केली आहे.

राष्ट्रपती निवडणुकी संबंधात चर्चा राजकीय परंपरा - 18 जुलैला होणार्‍या राष्ट्रपती निवडणुकीबाबत सरकारी पक्षाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रपती हे विरोधी आणि सरकारी पक्षाकडून सर्वानुमते निवडले जावेत यासाठी ही चर्चा केली. अशा प्रकारची चर्चा राजकीय परंपरा आहे. त्यानुसार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

'सेव विक्रांत' मोहिमेबाबत पोलिसांचा तपास अद्याप सुरू - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया आणि त्यांचे पुत्र निल सोमैया यांनी 'सेव विक्रांत' मोहीम चालवून कोट्यावधी रुपयांचा निधी गोळा केला. हा निधी राज भवनामध्ये जमा करणार असल्याचे मोहीम राबवत असताना त्यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र, निधी जमा झाल्यानंतर कोट्यावधीचा निधी हा त्यांच्या भारतीय जनता पक्षाला देण्यात आला. हा मोठा भ्रष्टाचार आहे आणि याबाबत मुंबई पोलीस तपास करत असून, लवकरच कारवाई होईल, असे संकेत संजय राऊत यांनी दिले.

हेही वाचा - Maharashtra Monsoon Updates : सोमवारपासून राज्यभरात जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा.. मॉन्सून होणार सक्रिय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.