ETV Bharat / city

सचिन वाझे यांना मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात हलवले.. गरज पडल्यास ओपन हार्ट सर्जरी - सचिन वाझे वोकहार्ट रुग्णालयात दाखल

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया परिसरात स्फोटके ठेवल्याप्रकरणी व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हृदय विकाराचा त्रास असल्याने चांगल्या उपचारासाठी मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर अँजिओग्राफी व गरज पडल्यास ओपन हार्ट सर्जरी केली जाणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

sachin vaze
sachin vaze
author img

By

Published : Sep 13, 2021, 3:09 PM IST

मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हृदय विकाराचा त्रास असल्याने चांगल्या उपचारासाठी मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर अँजिओग्राफी व गरज पडल्यास ओपन हार्ट सर्जरी केली जाणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली. सचिन वाझे गेले काही दिवस भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते.

हे ही वाचा - किरीट सोमैयांचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांवर मनी लाँड्रिंगचा आरोप

उपचारासाठी कोर्टाची परवानगी -

सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात वाझे यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने वाझे यांच्या निकटवर्तीयांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी कोर्टाकडून परवानगी मागितली होती. त्यांनतर त्यास भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हे ही वाचा - अलर्ट! पुढील चार दिवस मुसळधार बरसणार, गोदावरी ओव्हरफ्लो

सचिन वाझे यांच्या हृदयात ब्लॉकेज..

सचिन वाझे यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भिवंडीतील खासगी रुग्णालयात ३१ ऑगस्ट रोजी चार वाजता दाखल करण्यात आल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. तर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वाझे यांच्या हृदयात ब्लॉकेज असून त्यांच्यावर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी केली जाणार आहे. तसेच गरज पडली तर ओपन हार्ट सर्जरी केली जाणार आहे. वाझे यांना दाखल करण्यात आलेल्या रुग्णालयाबाहेर स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा, ठाणे, नवी मुंबई व मुंबई पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.