ETV Bharat / city

परिवहन विभागाचा मोठा निर्णय; आरटीओच्या 'या' सेवा केल्या डिजिटल, 18 लाख नागरिकांना फायदा - rto 6 services become digital

राज्य परिवहन विभागामार्फत ११५ अनुज्ञप्ती, नोदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधीत सेवा देण्यात येत असून, ८४ सेवा ऑनलाईन केले ( rto 6 services become digital ) आहेत. अर्जदार ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पेमेंट व कागदपत्रे अपलोड करु शकतो. याशिवाय या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास कार्यालयामध्ये मूळ नोंदणी प्रमाणपत्र / अनुज्ञप्तीसह कागदपत्रे जमा करण्यासाठी आरटीओ कार्यालयात याव लागते.

anil-parab
परिवहन विभागाचा मोठा निर्णय
author img

By

Published : Jun 2, 2022, 7:00 PM IST

मुंबई - आता एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी वाहन चालकांना लागणारे एनओसी, डुप्लिकेट नोंदणी, पत्ता बदल आणि आरसीमधील पत्ता बदल, परवान्यांचे नूतनीकरण संदर्भातील कामासाठी वाहन मालक- चालकांना आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. आजपासून या सहाही सेवा ऑनलाईन पद्धतींने अर्थात फेसलेस सेवा सुरु केल्या ( rto 6 services become digital ) आहे. या फेसलेस सेवांचे उदघाटन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

परिवहन विभागाचा मोठा निर्णय, अनिल परब यांची प्रतिक्रिया

१८ लाख नागरिकांना होणार फायदा - राज्य परिवहन विभागामार्फत ११५ अनुज्ञप्ती, नोदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधीत सेवा देण्यात येत असून, ८४ सेवा ऑनलाईन केले आहेत. अर्जदार ऑनलाईन अर्ज, ऑनलाईन पेमेंट व कागदपत्रे अपलोड करु शकतो. याशिवाय या सेवांचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास कार्यालयामध्ये मूळ नोंदणी प्रमाणपत्र / अनुज्ञप्तीसह कागदपत्रे जमा करण्यासाठी आरटीओ कार्यालयात याव लागते. केंद्र शासनाने ३ मार्च २०२१ रोजीच्या अधिसूचनेद्वारे १८ सेवा या आधारक्रमांकचा वापर करुन नागरिकांना फेसलेस पध्दतीने (ऑनलाईन) देण्याबाबत अधिसूचीत केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र्र राज्य परिवहन विभागाने अनेक सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या आहे. आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते आज सहा फेसलेस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी लागणारी एनओसी, डुप्लिकेट लायसन्स, पत्ता बदल आणि आरसीमधील पत्ता बदल, परवान्यांचे नूतनीकरण संदर्भातील कामासाठी नागरिकांना आरटीओमध्ये वाहन चालकांना जावे लागणार नाही. या योजनेमुळे जवळपास राज्यातील १७ ते १८ लाख नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती अनिल परब यांची माहिती दिली आहे.

१ ) दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र करिता अर्ज - ( Secondary registration certificate )

राज्यामध्ये साधारण दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता साधारण वार्षिक १ लाख अर्ज प्राप्त होत आहे. सदर कार्यपध्दती ऑनलाईन असल्यामुळे सद्य:स्थिती साक्षांकित केलेले अर्ज कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी यावे लागते. आता आधारक्रमांकाचा वापर करून वाहन मालकाची खात्री झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणा केल्यानंतर अर्जदारास कागदपत्रे सादर करण्याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता राहीली नसून,ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रक्रिया पूर्ण होंबार आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा अर्जदारास पोस्टाने प्राप्त होणार आहे.

२) ना-हरकत प्रमाणपत्र ( No-objection certificate )

राज्यामध्ये बाहेरील राज्यांकरिता ना-हरकत प्रमाणपत्राकरिता वार्षिक साधारण ३० हजार अर्ज प्राप्त होतात. सदर कार्यपध्दती ऑनलाइन असल्यामुळ सद्य:स्थिती साक्षांकित केलेले अर्ज कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी यावे लागते. आता आधारक्रमांकाचा वापर करुन वाहन मालकाची खात्री झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जदारास कागदपत्रे सादर करण्याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नसून, ऑनलाइन पध्दतीने सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ना-हरकत प्रमाणपत्र सुध्दा अर्जदारास घरबसल्या प्रिंट काढता येणे शक्य होणार आहे.

३) नोंदणी प्रमाणपत्र वरील पत्ता बदल ( Change of address on registration certificate )

राज्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलाकरिता वार्षिक साधारण २० हजार अर्ज प्राप्त होतात. सदर कार्यपध्दती ऑनलाईन असल्यामुळे सद्य:स्थिती साक्षांकित केलेले अर्ज व मूळ नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी यावे लागते. आता आधारक्रमांकाचा वापर करुन वाहन मालकाची खात्री झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणा केल्यानंतर अर्जदारास कागदपत्रे सादर करण्याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही, ऑनलाईन पध्दतीने सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नविन पत्त्यासह नोंदणी प्रमाणपत्र सुध्दा अर्जदारास पोस्टाने प्राप्त होणार आहे.

४) वाहन चालक अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण ( Duplication of driver's license )

राज्यामध्ये साधारण अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण प्रमाणपत्राकरिता वार्षिक साधारण २ लाख अर्ज प्राप्त होतात. सदर कार्यपध्दती ऑनलाईन असल्यामुळे सद्य:स्थिती साक्षांकित केलेले अर्ज कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी अर्जदारास यावे लागते. आता आधारक्रमांकाचा वापर करुन वाहन मालकाची खात्री झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणा केल्यानंतर अर्जदारास कागदपत्रे सादर करण्याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नसून, ऑनलाईन पध्दतीने सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असून दुय्यम अनुज्ञप्ती सुध्दा अर्जदारास पोस्टाने प्राप्त होणार आहे.

५) अनुज्ञप्तीचे पत्ता बदल ( License Address Change )

राज्यामध्ये साधारण अनुज्ञप्तीवरील पत्ता बदलकरिता वार्षिक २ लाखहून अधिक अर्ज प्राप्त होतात. सदर कार्यपध्दती ऑनलाईन असल्यामुळे सद्य:स्थिती साक्षांकित केलेले अर्ज जमा करण्यासाठी अर्जदारास कार्यालयामध्ये यावे लागते. आता आधारक्रमांकाचा वापर करुन वाहन मालकाची खात्री झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणा केल्यानंतर अर्जदारास कागदपत्रे सादर करण्याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही, ऑनलाईन पध्दतीने सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असून नविन पत्त्यासह अनुज्ञप्ती बदल सुध्दा अर्जदारास पोस्टाने प्राप्त होणार आहे.

६) अनुज्ञप्तीचे नुतणीकरण (License renewal)

राज्यामध्ये साधारण अनुज्ञप्तीचे नुतणीकरणकरिता वार्षिक साधारण १४ लक्ष अर्ज प्राप्त होतात. सदर कार्यपध्दती ऑनलाईन असल्यामुळे सद्य:स्थिती साक्षांकित केलेले अर्ज जमा करण्यासाठी अर्जदारास कार्यालयामध्ये यावे लागते. आता आधारक्रमांकाचा वापर करुन वाहन मालकाची खात्री झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरणा केल्यानंतर अर्जदारास कागदपत्रे सादर करण्याकरिता कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही, ऑनलाईन पध्दतीने सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असून नुतणीकरण केलेले अनुज्ञप्ती सुध्दा अर्जदारास पोस्टाने प्राप्त होणार आहे.

हेही वाचा - Puntamba Farmers Agitation : पुणतांबा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा दुसरा दिवस; शेतकऱ्यांनी फुकट वाटले कांदे द्राक्षे....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.