मुंबई - राज कुंद्राविरोधात अभिनेत्री शर्लिन चोप्राने 14 ऑक्टोबरला जुहू पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता तिने एक व्हिडिओ जारी करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्याय मागितला आहे.
अभिनेत्री शर्लिन चोप्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक व्हिडिओ जारी करत मदतीचे आवाहन केले आहे. शर्लिनने आरोप केला आहे की, राज कुंद्राने तिला फसवले असून लैंगिक शोषणदेखील केले आहे. तसेच राज कुंद्राने तिच्या घरी येऊन धमकी दिली असल्याचेही शर्लिनने म्हटले आहे.
हेही वाचा - राज कुंद्रा विरोधात तक्रार देण्यासाठी शर्लिन चोप्राने गाठले पोलीस स्टेशन
शर्लिनने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत -
राज कुंद्राविरोधात एप्रिल महिन्यातही शर्लिन चोप्राने पोलिसात तक्रार अर्ज केला होता. त्यावरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शर्लिनने आता एक व्हिडिओ जारी करत मुख्यमंत्र्यांकडे मदतीची विनंती केली आहे. तसेच त्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याची मागणीही शर्लिनने पोलिसांकडे केली आहे. शर्लिन शेवटी हा व्हिडिओ बनवताना भावनिक झाली असल्याचे दिसत आहे.
राज कुंद्राविरोधात पोलिसात तक्रार
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा हिने जुहू पोलीस स्टेशन गाठले होते. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शर्लिन तिच्या वकिलांसह पोलीस स्टेशनमध्ये 14 ऑक्टोबरला आली होती. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने तिच्या कामाचे पैसे अद्याप परत केलेले नाहीत. या कारणास्तव तिला राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसात एफआयआर नोंदवायचा आहे.
हेही वाचा - राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर शर्लिन चोप्राने दिली होती वादग्रस्त माहिती, बघा काय म्हणाली..