मुंबई मुंबई शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणून ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन Rakesh Jhunjhunwala Passes Away झाले झुनझुनवाला कुठे गुंतवणूक करतात याकडे सर्व गुंतवणूकदारांची नजर असायची आपल्याला पैशांची किंमत कळावी म्हणून आईवडील, सासऱ्या ऐवजी आपण स्वतः कमावलेला पैसा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा असा सल्ला गुंतवणूकदारांना दिला होता
स्वतःचा पैसा गुंतवणूक करा राकेश झुनझुनवाला यांचे आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ज्या कंपनीत गुंतवणूक करत त्यामधून चांगले रिटर्न्स येत होते. यामुळे झुनझुनवाला यांना सर्व गुंतवणूकदार फॉलो करायचे. नातेवाईक, आईवडिलांचा किंवा सासऱ्यांचा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका स्वतः कमावलेला पैसा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करा. यामुळे पैशांची किंमत तुम्हाला कळेल असे ते नेहमी गुंतवणूकदारांना सांगत.
त्यावेळीच गुंतवणुकीचे आवाहन मार्च २०२० मध्ये देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार झाला. यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला. शेअर मार्केटमध्ये मंदी होती. त्यावेळी म्हणजेच जून २०२० पासून सतत लहान गुंतवणूकदारांना ते गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आज त्यांचे गुंतवणूकदारांनी ऐकले असते तर मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकले असते.
हेही वाचा Rakesh Jhunjhunwala journey राकेश झुनझुनवाला यांनी केली होती पाच हजार रुपयांपासून सुरुवात