ETV Bharat / city

मुंबई, कोकणसह इतर भागात सलग दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता - konkan rain news

बहुतांश भागांमध्ये तापमानाने काही ठिकाणी 40 अंशाच्या वर पातळी ओलांडली होती. वातावरण बदलामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता मोठी आहे.

rain expected in next two days in mumbai kokan area
मुंबई, कोकणसह इतर भागात सलग दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता
author img

By

Published : Mar 25, 2020, 11:43 PM IST

मुंबई - राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल झालेला आहे. यामुळे एकीकडे उन्हाळा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि गारपीट असे चित्र निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसात दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. आजही काही भागात गारपीट झाली आहे. गुरुवार, शुक्रवार मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागांमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

राज्याच्या विविध भागांमध्ये सध्या तापमान वाढायला सुरुवात झाली आहे. बहुतांश भागांमध्ये तापमानाने काही ठिकाणी 40 अंशाच्या वर पातळी ओलांडली होती. वातावरण बदलामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल. मात्र, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता मोठी आहे. विजेच्या गडगडाटसह दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.