ETV Bharat / city

कोरोना  इफेक्ट : संचारबंदीत मुंबईतील 9373 जणांवर गुन्हे दाखल, अनेक आरोपींच्या मागावर पोलीस

मुंबईत संचारबंदीचा कायदा मोडण्याच्या 4812 प्रकरणात 9373 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अजून 1179 फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 2282 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे.

Pls
कारवाई करताना पोलीस अधिकारी
author img

By

Published : Apr 23, 2020, 2:58 PM IST

Updated : Apr 23, 2020, 3:51 PM IST

मुंबई - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात संचारबंदीसह कलम 144 लागू करण्यात आले आहे. असे असतानाही मुंबईत संचारबंदीचा कायदा मोडण्याच्या 4812 प्रकरणात 9373 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस अजून 1179 फरार आरोपींचा शोध घेत आहेत. 2282 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले असून तब्बल 5912 जणांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

गेल्या चोवीस तासात मुंबई शहरात कलम 188 नुसार 164 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, व अवैद्य वाहतूक प्रकरणी दक्षिण मुंबईतून 14 गुन्हे, मध्य मुंबईतून 62, पूर्व मुंबईत 9, पश्चिम मुंबईत 61 व उत्तर मुंबईत 18 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Last Updated : Apr 23, 2020, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.