ETV Bharat / city

मुंबईत लसीकरणाचा टक्का वाढला, ९२ टक्के लसीकरण

मुंबईत लसीकरणाच्या टक्यात वाढ झाली असून 92 टक्के लसीकरण आज करण्यात आले. ३५३९ म्हणजेच लोकांचे लसीकरण करण्यात आले.

author img

By

Published : Jan 22, 2021, 8:46 PM IST

percentage of vaccinations has increased to 92 percent, In Mumbai,
मुंबईत लसीकरणाचा टक्का वाढला, ९२ टक्के लसीकरण

मुंबई - देशभरात शनिवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमुळे स्थगितीनंतर मंगळवारी पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत पालिकेच्या १० केंद्रांवर ३९ बुथवर ३८५२ लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी ३५३९ म्हणजेच ९२ टक्के लोकांना आज (शुक्रवारी) लसीकरण करण्यात आले. आजच्या लसीकरणादरम्यान २ जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

लसीकरणाला सुरुवात -

मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर काही दिवसांतच मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. गेल्या दहा महिन्यांत कोरोनाला थोपवताना आरोग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मात्र, पालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात आली आहे. यातच शनिवार १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून लसीकरणाला सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘बीकेसी’ कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ झाला. पालिकेच्या ९ आणि राज्य सरकारच्या एक अशा एकूण १० केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र, कोविन ऍपवर तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरणाला स्थगिती देण्यात आली होती.

इतके झाले लसीकरण -

शनिवारी १६ जानेवारीला १९२६ लोकांना लस देण्यात आली होती. काल मंगळवारी १९ जानेवारी रोजी लसीकरणादरम्यान ३२०० पैकी १५९७ लोकांना लस देण्यात आली. २० जानेवारीला ३३०० पैकी १७२८ लोकांना लस देण्यात आली होती. आज शुक्रवारी ३८५२ पैकी ३५३९ लोकांना लस देण्यात आली. परळ येथील केईएम रुग्णालयात ६८५, सायन येथील टिळक रुग्णालयात ३०१, विलेपार्लेतील कूपर रुग्णालयात ३६८, नायर रुग्णालयात ३७८, सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात ७२, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ५७२, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालयात ५१७, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात २७१ आणि बीकेसी भव्य कोविड सुविधा केंद्रात ३५० तर जेजे रुग्णालयात २५ जणांना लस दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.