ETV Bharat / city

राज्यात एक कोटी पूर्ण 'लसवंत', 3.16 कोटी लोकांना मिळाला पहिला डोस

author img

By

Published : Jul 26, 2021, 6:09 PM IST

कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली. तसेच संपूर्ण देशात एक कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने स्वत:च्या नावावर नोंदवल्याचा दावा केला आहे.

राज्याने पार केला एक कोटीचा विक्रम
राज्याने पार केला एक कोटीचा विक्रम

मुंबई - कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिली. तसेच संपूर्ण देशात एक कोटींहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने स्वत:च्या नावावर नोंदवल्याचा दावा केला आहे. दरम्यान आरोग्य विभागाच्या कामांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तोंडभरून कौतुक केले.

एक कोटी नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डोस
राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण आज सायंकाळी चार वाजेपर्यंत करण्यात आले. दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे. लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटींचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. तसेच राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ. व्यास म्हणाले.

हेही वाचा - KARGIL VIJAY DIWAS : बॉम्ब हल्ल्यात पाय तुटला, रक्ताची लागली धार, तरीही जिवाची पर्वा न करता 8 शत्रू टिपले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.