ETV Bharat / city

Omicron In Maharashtra : राज्यात आज ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण; रुग्णांचा आकडा ३२ वर, २५ रुग्णांना डिस्चार्ज - ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना व्हायरस

संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron variant ) विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज ओमायक्रॉनच्या (New Omicron patients) आणखी चार रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी दोन रुग्ण उस्मानाबादेतील, एक रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण बुलढाणा येथील आहे. आतापर्यंत 32 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे.

omicron-variant-
omicron-variant-
author img

By

Published : Dec 15, 2021, 10:18 PM IST

Updated : Dec 16, 2021, 1:23 PM IST

मुंबई - जगभरात आढळून आलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आतापर्यंत (Omicron variant in maharashtra) ओमायक्रॉनचे २८ रुग्ण आढळून आले होते. आज उस्मानाबाद येथे २, मुंबई येथे १ तर बुलढाणा येथे १ असे चार रुग्ण (New Omicron patients) आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. एकूण ३२ पैकी २५ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण -

आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ४ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी २ रुग्ण उस्मानाबाद, १ रुग्ण मुंबई येथील १ रुग्ण बुलढाणा येथील आहे. आजपर्यंत राज्यात एकूण ३२ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ३२ रुग्णांपैकी मुंबई १३, पिंपरी चिंचवड १०, पुणे मनपा २, उस्मानाबाद २, कल्याण डोंबिवली १, नागपूर १, लातूर १, वसई विरार १ आणि बुलढाणा १ असे रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे माहिती देताना
२५ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात अति जोखमीच्या देशातून १४ हजार ५२२ तर इतर देशातून ८३ हजार ६०२ असे एकूण ९८ हजार १२४ प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अति जोखमीच्या देशातील १४ हजार ५२२ तर इतर देशातील २२६८ अशा एकूण १६ हजार ७९० प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अति जोखमीच्या देशातून आलेले ३० तर इतर देशातून आलेले ९ अशा एकूण ३९ प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेनसिंग चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ३२ प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. एकूण ३२ रुग्णांपैकी २५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून विमानतळावर आलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४४७ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेनसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ३२ जणांचा अहवाल अद्याप बाकी आहे अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

..या जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण -
मुंबई १३
पिंपरी चिंचवड १०
पुणे मनपा २
उस्मानाबाद २
कल्याण डोंबिवली १
नागपूर १
लातूर १
वसई विरार १
बुलढाणा १

Last Updated : Dec 16, 2021, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.