ETV Bharat / city

राज्यभरात लालपरी सुसाट; 28 लाखापर्यत पोहचली प्रवासी संख्या! - राज्यभरात लालपरी सुसाट बातमी

न्यायालयाने दिलेल्या मुदतीत मोठा प्रमाणात संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या राज्यभरात 90 हजार एसटी कर्मचारी हजर झाले आहे. तर उर्वरित कर्मचारी येत्या काही रुजू होण्याची शक्यता आहे. हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महामंडळाने राज्यातील एसटीची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मोठा दिलासा मिळाला आहे.

number of st passengers has reached 28 lakhs in state
राज्यभरात लालपरी सुसाट
author img

By

Published : May 11, 2022, 10:23 PM IST

मुंबई - तब्बल सहा महिने एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटीची वाहतूक विस्कळीत झालेली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्यावर एसटी पुन्हा धावू लागली आहे. सध्या एसटीची दररोजची प्रवासी संख्या 28 लाखापर्यत पोहोचली असून 17 कोटींचे महसूल मिळणार आहे.

90 हजार एसटी कर्मचारी कामावार हजर - एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासह विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यापासून संप पुकारला होता. तसेच संपकरी यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना कामावर 22 एप्रिल 2022 पर्यत रुजू होण्याच निर्देश दिले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत मोठा प्रमाणात संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. सध्या राज्यभरात 90 हजार एसटी कर्मचारी हजर झाले आहे. तर उर्वरित कर्मचारी येत्या काही रुजू होण्याची शक्यता आहे. हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महामंडळाने राज्यातील एसटीची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पन्न 17 कोटींपेक्षा जास्त - कोरोना पूर्वकाळात एसटी महामंडळाच्या बसेसमधून दररोज 65 लाख प्रवासी प्रवास करत होते. एसटी महामंडळाला प्रवासी वाहतूक इथून प्रत्येक दिवशी 21 कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. कर्मचार्‍यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशता सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. मात्र, आता न्यायालयाच्या निर्देशानंतर 90 हजार एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहे. राज्यभरात 31 हजार 500 एसटी फेऱ्या सुरू असून प्रवासी संख्या 28 लाखापर्यत पोहचली आहे. त्यातून एसटी महामंडळाला 17कोटी 55 लाख रुपयांचा महसूल मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.