मुंबई - कोरोना, ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे निर्बंध पाळून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला मुंबईकरानीही मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे. नवीन वर्षात मुंबईकरांनी तपासणीदरम्यान ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस नोंदवण्यात येतात. मुंबई काल (शुक्रवारी) एकही ड्रिंक अँड ड्राईव्हची (Drink and Drive In Mumbai) केस नोंदवण्यात आली नाही.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली होती. मुंबईमध्ये गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. नववर्षानिमित्त पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिंडोशी परिसरात (Dindoshi Area) वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला लोकांकडून प्रतिसाद मिळत असून ड्रिंक अँड ड्राईव्हचे (No Drink and Drive Case in Mumbai) एकही प्रकरण दिंडोशी परिसरात सापडले नाही.
मुंबईत कडक केले नियम
रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी (New Year Celebrations 2022) जमता येणार नाही. लोकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे बाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिंडोशी परिसरात वाहतूक पोलीस विशेष सतर्क दिसले. येथे सीट बेल्ट आणि हेल्मेट नसलेल्या अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. नववर्ष स्वागतादरम्यान ड्रिंक आणि ड्राईव्हचे एकही प्रकरण आढळले नाही. पोलिसांनी तशी माहिती दिली आहे. मुंबई तसेच उपनगरात नववर्षानिमित्त चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी पश्चिम उपनगरात 35 ठिकाणी नाकाबंदी केली. त्याप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या लोकांना पोलिसांच्यावतीने अनोखी भेटदेखील देण्यात आल्या. जे लोक वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई केली.
हेही वाचा - Mla Patil Corona Positive: मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांना कोरोनाची लागण