ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारी ७३ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद - 28 फेब्रुवारी मुंबई कोरोना आकडेवारी

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या (Mumbai Corona Update) दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. आज (28 फेब्रुवारी) मुंबईत ७३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १८ वेळा तर फेब्रुवारी महिन्यात ९ वेळा शून्य मृत्यूची नोंद मुंबईत झाली आहे.

mumbai corona
मुंबई कोरोना
author img

By

Published : Feb 28, 2022, 7:17 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या (Mumbai Corona Update) दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. आज (28 फेब्रुवारी) मुंबईत ७३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून, दिवसभरात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १८ वेळा तर फेब्रुवारी महिन्यात ९ वेळा शून्य मृत्यूची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ८१५ सक्रिय रुग्ण (Active Corona Cases) आहेत.

जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन सोमवारी ९६ आणि शनिवारी ८९ रुग्णांची नोंद झाली होती. सोमवारी त्यात आणखी घट होऊन ७३ रुग्णांची नोंद झाली आहे.

मुंबईतील कोरोना नियंत्रणात -

मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (२८ फेब्रुवारीला) ७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

आज ९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार ४७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३६ हजार ८६ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८१५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ५०६५ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.

९८.१ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या ७३ रुग्णांपैकी ६६ म्हणजेच ९० टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३५,९२७ बेडस असून त्यापैकी ६९९ बेडवर म्हणजेच १.९ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९८.१ टक्के बेड रिक्त आहेत.

१८ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १८ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.