मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. गेले काही दिवस १००च्या आत रुग्ण आढळून येत आहेत. सध्या गेल्या २ वर्षांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद होत आहे. आज ५० रुग्णांची नोंद झाली आहे. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के आहे. तर ९० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
५० नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत आज ५० नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद ( zero corona patient deaths in Mumbai ) झाली आहे. आज २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात ( Discharge to 28 corona patients ) आला आहे. आजपर्यंत एकूण १० लाख ५७ हजार ८७९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ००९ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २९० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १५७९८ दिवस इतका आहे.
९९.०५ टक्के बेड रिक्त
मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००४ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ५० रुग्णांपैकी ५० म्हणजेच १०० टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार २२८ बेड्स आहेत. त्यापैकी १४ बेडवर म्हणजेच ०.०५ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.०५ टक्के बेड रिक्त आहेत.
हेही वाचा-House For MLA : 'आमदारांच्या घरासाठी कुठलाही प्रस्ताव किंवा कोणत्याही आमदाराची मागणी नाही'
रुग्णसंख्या घटतेय -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या आहेत. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेदरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे.
हेही वाचा-विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द, रविवारी देखील शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय
अशी आहे कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या
२१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४, ११ मार्चला ५४, १२ मार्चला ३, १३ मार्चला ४४, १४ मार्चला २७, १५ मार्चला ५०, १६ मार्चला ४४, १७ मार्चला ७३, १८ मार्चला ४८, १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २३ मार्चला ४६, २४ मार्चला ५४, २५ मार्चला ३८, २६ मार्चला ३३, २७ मार्चला ४३, २८ मार्चला ५० रुग्णांची नोंद झाली आहे.
४२ वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झालेली आहे. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर, २ जानेवारी २०२२, १५ फेब्रुवारी, १६ फेब्रुवारी, १७ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २५ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारीला, १ मार्च, २ मार्च, ३ मार्च, ४ मार्च, ५ मार्च, ७ मार्च, ८ मार्च, ९ मार्च, १० मार्च, ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च, १५ मार्च, १७ मार्च, १८ मार्च, १९ मार्च, २० मार्च, २१ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २४ मार्च, २६ मार्च, २८ मार्चला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४२ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.