मुंबई - ‘धर्माच्या नावावर गेल्या सात ते आठ वर्षांपासून सातत्याने मतं मागितली जात आहेत. मात्र, यावर निवडणूक आयोग गप्प आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून धर्माच्या नावाने सातत्याने मतं मागितली जात आहेत. धर्माच्या नावावर मतं मागणे किंवा धार्मिक द्वेष पसरवणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. निवडणूक आयोग या सर्व मुद्द्यांवर गप्प आहे. ही निवडणूक आयोगाची लाचारी असून, लवकरच निवडणूक आयोगाने याबाबत पावले उचलली नाही. तर, निवडणूक आयोग आपलं विश्वसनीयता गमावून बसेल’ असं मत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलेय. उत्तर प्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष धर्माच्या आधारावर मत मागत असल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.
आपल्या धर्माचा गर्व असावा
आपल्या धर्मावर गर्व असलाच पाहिजे. मात्र, इतर धर्माबद्दल कोणाच्या मनातही द्वेष असू नये असंही मतं नवाब मलिक यावेळी म्हणाले. तसेच आपल्या हिंदू धर्मावर गर्व करा. मात्र इतर धर्मामध्ये गृन्हा पसरू नका. हेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कालच्या भाषणामध्ये सांगितल्याचेही यावेळी नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा - CM Uddhav Thackeray : 'ते दिवस आठवा ज्यावेळी भाजपचं डिपॉझिट जप्त होत होतं' : उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार