ETV Bharat / city

Navratri festival 2022 : नवरात्री म्हणजे आदिशक्तीची पूजा ; डीजे वापरण्याची गरज काय ? न्यायालयाचा सवाल

देवी शक्तीची पुजा करण्यासाठी ध्यान आणि एकाग्रतेची आवश्यकता (Navratri is festival of worshiping Adishakti) असते. त्यामुळे गरबा आणि दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकर आदी आधुनिक साऊंड सिस्टिम वापरण्याची गरज नाही. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले (High Court observation) आहे.

Bombay High Court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Sep 30, 2022, 6:57 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नवरात्री उत्सव सुरू आहे. त्यातच मुंबईतील अनेक ठिकाणी गरबा दांडियाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आज असे म्हटले आहे की, देवी शक्तीची पुजा करण्यासाठी ध्यान आणि एकाग्रतेची आवश्यकता (Navratri is festival of worshiping Adishakti) असते. त्यामुळे गरबा आणि दांडियासाठी डीजे, लाऊडस्पीकर आदी आधुनिक साऊंड सिस्टिम वापरण्याची गरज नाही. असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले (High Court observation) आहे.

नवरात्रोत्सवासाठी ध्वनी उपकरणांवर बंदी - मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी दरम्यान असे म्हटले आहे. ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत सायलेंट झोन म्हणून घोषीत केलेल्या खेळाच्या मैदानावर चालू असलेल्या नवरात्रोत्सवासाठी ध्वनी उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्याच्या आदेशाची विनंती करणाऱ्या याचिकेला उत्तर देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले (Navratri festival 2022) आहे.

नवरात्री शक्तीच्या रूपाची पूजा - दरम्यान न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या खंडपीठाने नवरात्रोत्सवाच्या आयोजनावर आक्षेप घेत एका याचिकेवर हा आदेश दिला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, नवरात्रीच्या उत्सवात देवतेची आराधना वेगवेगळी असू शकते. नवरात्रीत शक्तीच्या रूपाची पूजा केली जाते. त्यामुळे यासाठी मोठ्या आवाजात संगीत लावण्याची आवश्यकता (Navratri festival use modern sound DJ) नाही.

एकाग्रतेशिवाय पूजा अशक्य - याशिवाय न्यायालयाने असेही नमूद केले आहे की, शक्तीच्या देवीची पूजा तेव्हाच परिणामकारक ठरते - जेव्हा ती कोणत्याही बाह्य व्यत्ययाशिवाय लक्ष देऊन केली जाते. मनाची पूर्ण एकाग्रता असल्याशिवाय कोणतीही पूजा आणि भक्ती शक्य नाही. भक्तांनी त्याच्या कृतींद्वारे उत्सवाच्या शिस्त आणि पावित्र्याचा त्याग होणार नाही, याची खात्री केली पाहिजे असंही न्यायालयाने म्हटलं (Bombay High Court) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.