ETV Bharat / city

Dagadi Chawl Navratri Festival: दगडी चाळीतील गुन्हेगारीचा अस्त; सामंज्यस्याने साजरा होतोय नवरात्रोत्सव आणि सामाजिक उपक्रम - दगडी चाळ नवरात्रोत्सव

मुंबईतील भायखळा येथील दगडी चाळ ही कुख्यात अरुण गवळी (Arun Gawli Dagadi Chawl) यांचा अड्डा मानली जायची. अरुण गवळी यांच्या गुन्हेगारी कारवाया या चाळीतून अथवा या परिसरातून होत होत्या; मात्र या चाळीची आता ओळख पूसली गेली असून सर्वसामान्यपणे येथील नवतरुण हे उच्च शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायात स्थिरावले आहेत. त्यामुळे दगडी चाळ ही जरी अरुण गवळी यांच्या नावाने आजही ओळखली जात असली तरी येथील सण आणि उत्सव (Navratri celebrations Dagadi Chawl) हे मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि मोकळ्या वातावरणात पार पडतात.

मुंबईतील भायखळा येथील दगडी चाळ
मुंबईतील भायखळा येथील दगडी चाळ
author img

By

Published : Sep 24, 2022, 6:57 PM IST

Updated : Oct 4, 2022, 4:40 PM IST

मुंबई: मुंबईतील भायखळा येथील दगडी चाळ ही कुख्यात अरुण गवळी (Arun Gawli Dagadi Chawl) यांचा अड्डा मानली जायची. अरुण गवळी यांच्या गुन्हेगारी कारवाया या चाळीतून अथवा या परिसरातून होत होत्या; मात्र या चाळीची आता ओळख पूसली गेली असून सर्वसामान्यपणे येथील नवतरुण हे उच्च शिक्षण घेऊन नोकरी व्यवसायात स्थिरावले आहेत. त्यामुळे दगडी चाळ ही जरी अरुण गवळी यांच्या नावाने आजही ओळखली जात असली तरी येथील सण आणि उत्सव (Navratri celebrations Dagadi Chawl) हे मोठ्या उत्साहात जल्लोषात आणि मोकळ्या वातावरणात पार पडतात, अशी माहिती या नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष विनायक करावडे यांनी दिली आहे.

दगडी चाळीत सुरू असलेली नवरात्रोत्सवाची तयारी

नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून समाजसेवा- दगडी चाळ नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष विनायक करावडे म्हणाले, दगडी चाळ सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून गेल्या 45 वर्षांपासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो; दगडी चाळ नवरात्रोत्सव मंडळाचे यंदाचे 49 वे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव उत्साहात साजरे होणार आहे. 50 वर्षांपूर्वी येथे जे काही घडले असेल तशी स्थिती आता नाही. चाळीची ओळख राहिलेल्या अरुण गवळी यांनी मागील घटनांचा डाग पुसून टाका, असा संदेश दिला आहे. नवरात्र उत्सवा व्यतिरिक्त आरोग्य शिबिर भरवणे, गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे, लोकांच्या अडीअडचणीला त्यांना विविध वस्तूंची अथवा वैद्यकीय मदत अरुण गवळी यांच्या अधिपत्याखाली सातत्याने केली जात असल्याचेही करावडे यांनी सांगितलं.

दगडी चाळीत काल्पनिक मंदिर - दगडी चाळीतील नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे. येथील देवी ही नवसाला पावली जाते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी करतात. हे भाविक अत्यंत मोकळ्या वातावरणात या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे दरवर्षी विविध देखावा या ठिकाणी उभारला जातो. यंदाही काल्पनिक मंदिर या ठिकाणी उभारले जात असल्याची माहिती करावडे यांनी दिली आहे. नवरात्र उत्सवाला अरुण गवळी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. तेच या नवरात्र उत्सवाचे संयोजक आहेत. मात्र त्यांच्या पूर्व इतिहासाचा आता या ठिकाणी प्रभाव नाही, अशा कोणत्याही गोष्टींना थारा देऊ नका असे स्वतः गवळी यांनीच कार्यकर्त्यांना आदेश दिले आहे असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Oct 4, 2022, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.