मुंबई - मुंबईच्या कांदिवली भागात मामा भाचीच्या नात्याला लाजिरवाणी घटना समोर आली आहे. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीच्या मामाने तिच्या प्रियकराला दूर करण्यासाठी कट रचल्याचे समोर आले आहे. सूरज विश्वकर्मा असे अटक आरोपीचे नाव असून त्याचे वय २७ वर्षे आहे. दीपक कट्टूकर असे मृताचे नाव असून, त्याचे वय २० वर्षे आहे.
कांदिवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाचीकडून प्रियकराला दूर करण्यासाठी मामाने एक कट रचला. भाचीच्या प्रियकराला १२ मे रोजी मुंबईला लागून असलेल्या भाईंदर खाडीजवळ नेले आणि त्याला भरपूर दारू प्यायला लावली. तेव्हा प्रियकर दीपक कट्टूकर नशेमध्ये शुद्ध हरपून बसला. प्रियकर दीपक नशेत असल्याचा फायदा घेत मुलीचा मामा सूरज विश्वकर्मा भाईंदर याने त्याला खाडीच्यावरच्या रेल्वे पूलावर फोटो काढण्याच्या बहाण्याने नेले आणि फोटो काढण्याचा भासवत दिपकला रेल्वे पुलावरून खाली खाडीत ढकलले.
दुसरीकडे दीपक कट्टूकर हे दोन दिवस घरी न परतल्याने १४ मे रोजी त्यांच्या कुटुंबियांनी कांदिवली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने तपास सुरू केला असता. आरोपी सूरज विश्वकर्मा याने बेपत्ता दीपक कट्टूकर याला कांदिवली रेल्वे स्थानकावरून भाईंदरच्या दिशेने नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा तपास सुरू असताना कांदिवली पोलिसांना वसईच्या समुद्राच्या किनारी एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत वसई पोलिसांनी मृताचा मृतदेह बेवारस म्हणून पुरला होता. कांदिवली पोलिसांनी मृतदेह पुन्हा जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढला आणि त्याचे मेडिकलकरून कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या कांदिवली पोलिसांनी आरोपी सूरज विश्वकर्मा याला अटक करून तपास केला असता. आरोपीचेही त्याच मुलीवर प्रेम असल्याचे निष्पन्न झाले. ज्यावर मृत दीपकचे प्रेम होते. आणि दीपकला त्याच्या प्रेमाच्या वाटेपासून दूर करण्यासाठी आरोपीने आधी त्याला पार्टी देण्याच्या बहाण्याने त्याचे अपहरण केले. नंतर त्याला भाईंदर खाडीजवळ नेले आणि भरपूर बिअर प्यायला लावली. नंतर भाईंदर खाडीवरील रेल्वे पुलावर नेले आणि फोटो काढण्याच्या बहाण्याने तेथेच त्याने तिला ढकलून मारले.
हेही वाचा - लडाखमध्ये सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात; 7 जवानांचा मृत्यू, काही जवान जखमी