मुंबई - कोरोनाच्या काळात अनेक गुन्हे घडल्याचे आपण पाहिले आहे. यादरम्यानच रमण राघव, बियर मॅननंतर मुंबईत आणखीन एका सायको किलरची दहशत सर्वत्र पसरली होती. मुंबईच्या रस्त्यावर हा सायको किलर बिनधास्त फिरत होता. सुरेश शंकर गौडा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने 2015 सालीही अशाच प्रकारे कुर्ल्यात एकाची हत्या केली होती.
नक्की काय घडलं?
शनिवारी भायखळा आणि जे.जे मार्ग परिसरातील फुटपाथवर झोपलेल्या दोन जणांनी हत्या या सायको किल्लरने केली. अवघ्या 15 मिनिटात आरोपीने दोन व्यक्तीच्या डोक्यात फेव्हर ब्लॉक टाकून, त्यांची दगडाने ठेचून निर्घुण हत्या केली. या हत्येमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती. मात्र, आता मुंबई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या नराधमाला शोधून काढले आणि त्याला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने या हत्या सहज म्हणून केल्या असल्याचे सांगितले.
याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुरेश शंकर गौडा असे असून 2015 साली त्याने अशाचे प्रकारे कुर्ल्यात एक हत्या केली होती. त्यामुळे त्याने अशा प्रकारच्या अनेक हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. 2015 साली कुर्ल्यातील हत्या प्रकरणी आरोपी गौडाला अटक करण्यात आली होती. मात्र, पुराव्या अभावी त्याची 2016 साली सुटका झाली. पण आता मुंबई पोलीस फुटपाथवर झालेल्या सर्व हत्यांच्या केसेस पडताळणार आहेत. सध्या हा सायको किलर आरोपी तुरुंगात असून भायखळा पोलीस दुसऱ्या हत्येच्या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहेत.