मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूच्या तीन लाटा मुंबईत आल्या आहेत. तीनही लाटा आटोक्यात आल्या असताना जगभरात पुन्हा कोरोना विषाणूच्या ओमायक्रोन नवा हेरिएंट स्टेल्थ बी - २ ने ( Stealth B 2 variant omicron Mumbai ) हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या विषाणूवर मुंबईकरांनी याआधीच मात केली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये ही समाधानकारक आकडेवारी समोर आली असल्याने तूर्तास तरी मुंबईला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - वीज कर्मचारी संपावर ठाम; राज्य सरकारकडून मंगळवारची नियोजित बैठक रद्द
मुंबईत कोरोनाचा प्रसार : मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार होऊन तीन लाटा आल्या. दुसऱ्या लाटेत डेल्टामुळे दिवसाला सर्वाधिक ११ हजार, तर तिसऱ्या लाटेत ओमायक्रोन विषाणूमुळे दिवसाला सर्वाधिक २० हजार रुग्णांची नोंद झाली. ओमायक्रोन घातक नसला तरी झपाट्याने प्रसार होत असल्याने मुंबई महापालिकेने योग्य ते नियोजन केले आणि त्याला मुंबईकरांची साथ मिळाली. त्यामुळे, ओमायक्रोन विषाणूला परतवण्यात पालिकेला यश आले.
स्टेल्थ बी - २ वर मुंबईकरांची मात : मुंबईत डिसेंबर दरम्यान कोरोनाची तिसरी लाट आली. ही लाट आटोक्यात आली असतानाच पुन्हा युरोप, चीनसह अनेक देशांत ओमायक्रोनचा नवा व्हेरिएंट स्टेल्थ बी - २ ने सध्या थैमान घातले आहे. परंतु, स्टेल्थ बी - २ वर मुंबईकरांनी यापूर्वीच मात केली. पालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालात २७१ रुग्णांनी स्टेल्थ बी - २ वर मात केल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईत आलेल्या ‘ओमायक्रोन’च्या तिसर्या लाटेतच या नव्या व्हेरिएंटला रुग्णांनी हरवल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये ही समाधानकारक आकडेवारी समोर आली असल्याने तूर्तास तरी मुंबईला दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्यांत खलबते! राजकीय चर्चेला उधाण