ETV Bharat / city

मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा, 'त्या' प्रकरणी सीबीआयमार्फत तपास नाही - अनंत करमुसे

अनंत करमुसे ( Anant Karmuse ) यांना अपहरण व मारहाण प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत ( CBI ) करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मंगळवारी (दि. 26 एप्रिल) या याचिकेवर सुनावणी झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. या प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांना 14 ऑक्टोबर, 2021 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटकाही झाली होती.

मंत्री जितेंद्र आव्हाड
मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Apr 26, 2022, 6:45 PM IST

मुंबई - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांना मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) मोठा दिलासा दिला आहे. अनंत करमुसे यांना अपहरण व मारहाण प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत ( CBI ) करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मंगळवारी (दि. 26 एप्रिल) या याचिकेवर सुनावणी झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. पी.बी. वारले आणि ए.एम. मोडक या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

अनंत करमुसे ( Anant Karmuse ) यांनीच या प्रकरणाच्या चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्याची मागणी केली होती. करमुसे यांचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी घटना घडल्यानंतर सव्वा वर्षांनंतर म्हणजेच 14 ऑक्टोबर, 2021 रोजी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका झाली. पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनीच या अटकेसंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

काय आहे प्रकरण..? - घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल, 2020 मध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. त्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी करमुसे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना अटकही केली होती. 14 ऑक्टोबर, 2021 रोजी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून त्यांना ठाणे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 10 हजार रुपयांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा - Mumbai CP Rana Video : 'त्या' व्हिडिओचा अन् नवनीत राणांच्या तक्रारीचा काहीही संबंध नाही - वकील रिजवान मर्चेंट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.