ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत सोमवारच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट , १ हजार २४२ नव्या रुग्णांची नोंद

author img

By

Published : Jun 7, 2022, 7:59 PM IST

Updated : Jun 7, 2022, 8:36 PM IST

मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे.  झाली. रविवारी (५ जून) ९६१ रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी (दि. ७ जून) त्यात आणखी वाढ होऊन १ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५ हजार ९७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मुंबई कोरोना
मुंबई कोरोना

मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवारच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या ही ८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईत रविवारी (५ जून) ९६१ रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी (दि. ७ जून) त्यात आणखी वाढ होऊन १ हजार २४२ रुग्णांची नोंद झाली आहे. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ५ हजार ९७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढल्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

१ हजार २४२ नवे रुग्ण - मुंबईत आज मंगळवारी १ हजार २४२ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ५०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ७१ हजार ७७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४६ हजार २३३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजार ९७४ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९८६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०७० टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या १ हजार २४२ रुग्णांपैकी ११६८ म्हणजेच ९४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २४ हजार ६०० बेड्स असून त्यापैकी २५४ बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्क्यांहून अधिक बेड रिक्त आहेत.

रुग्णसंख्या वाढतेय - मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. दरम्यान, कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च, एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर गेली आहे. ३ मे ला १००, ४ मे ला ११७, ५ मे ला १३०, ६ मे ला ११७, ७ मे ला १७२, ८ मे ला १२३, ९ मे ला ६३, १० मे ला १२२, ११ मे ला १२४, १२ मे ला १३९, १३ मे ला १५५, १४ मे ला १३१, १५ मे ला १५१, १७ मे ला १५८, १८ मे ला १९४, १९ मे ला २२३, २० मे ला २१३, २१ मे ला १९८, २२ मे ला २३४, २३ मे ला १५०, २४ मे ला २१८, २५ मे ला २९५, २६ मे ला ३५०, २७ मे ला ३५२, २८ मे ला ३३०, २९ मे ला ३७५, ३० मे ला ३१८, ३१ मे ला ५०६, १ जून ला ७३९, २ जून ला ७०४, ३ जूनला ७६३, ४ जून ला ८८९, ५ जून ला ९६१, ६ जून ला ६७६, ७ जून ला १२४२ रुग्णांची नोंद झाली आहे.

१०३ वेळा शून्य मृत्यूची नोंद - मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा तर जून महिन्यात ४ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा - BMC Lease Policy : महसूल वाढीसाठी महापालिका उदासीन, भूखंड भाडेतत्वावर देण्याच्या नव्या धोरणाकडे दुर्लक्ष

Last Updated : Jun 7, 2022, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.