मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूची तिसरी लाट ( The third wave of corona virus ) आटोक्यात आली आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट ( Decrease in patients) होऊन गेले काही दिवस ५० च्या आत रुग्ण आढळून येत होते. त्यात वाढ होऊन बुधवारी ७३, गुरुवारी ५६ तर रविवारी ५५ रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र आज (मंगळवारी) रुग्णसंख्येत वाढ होऊन ८५ नव्या रुग्णांची ( 85 NEW CORONA CASES ) नोंद झाली आहे. तसेच शून्य मृत्यूची नोंद ( deaths ) झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून ३९० सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत.
८५ नवे रुग्ण : मुंबईत आज मंगळवारी ८५ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५८ हजार ८८४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३८ हजार ९३२ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ५६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३५७ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १४,०४० दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.००५ टक्के इतका आहे. मुंबईत आज आढळून आलेल्या ८५ रुग्णांपैकी ८५ म्हणजेच १०० टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. मुंबईत रुग्णालयांमध्ये २६ हजार ०४४ बेड्स असून त्यापैकी १० बेडवर रुग्ण आहेत. मुंबईत ९९ टक्के बेड रिक्त आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार : मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. १९ मार्चला २९, २० मार्चला २७, २१ मार्चला २८, २२ मार्चला २६, २४ मार्चला ५४, ३१ मार्चला ४२, १ एप्रिलला ३२, २ एप्रिलला ४९, ३ एप्रिलला ३५, ४ एप्रिलला १८, ५ एप्रिलला ५६, ६ एप्रिलला ५१, ७ एप्रिलला ४१, ८ एप्रिलला ४९, ९ एप्रिलला ५५, १० एप्रिलला ३५, ११ एप्रिलला २६, १२ एप्रिलला ५२,१३ एप्रिलला ७३, १४ एप्रिलला ५६, १५ एप्रिलला ४४, १६ एप्रिलला ४३, १७ एप्रिलला ५५, १८ एप्रिलला ३४, १९ एप्रिलला ८५ रुग्णांची नोंद झाली आहे.
६१ वेळा शून्य मृत्यूची नोंद : मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण ६१ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा तर एप्रिल महिन्यात १६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा - Manoj Pandey : नागपूरकर मनोज पांडे लष्करप्रमुख झाल्याचा आनंद.. बालपणीच्या मित्राने दिला आठवणींना उजाळा