मुंबई - भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून गेली सात वर्षे ड्रामा करत निवडणुका जिंकल्या असा घणाघात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजप सात वर्षापासून केंद्रात सत्तेत आहे. राज्यात सत्तेवर येताच इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी पंतप्रधानाच्या हस्ते निवडणुकीत ड्रामा केला आणि आगामी निवडणुका काढल्या, असा आरोप जगताप यांनी केला. बाबासाहेबांचे स्मारक कुठंपर्यंत पुर्ण झालं आहे. कधी ते जनतेला, जगाला खुलं केलं जाईल ते कळावे. मात्र प्रत्येक गोष्टीत भाजप राजकारण करत असून त्याचा निषेध करत असल्याचे जगताप म्हणाले.
फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर इतिहासच बदलण्याचे पाप करत होते. मात्र न्यायालयाने त्यांना चपराक दिली. जे दिशानिर्देशक साहित्य आहे, त्यात बदल करू नका, अशा सूचना देखील केल्या. अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.
डॉ.आंबेडकर स्मारकाच्या नावावर भाजपकडून सात वर्षे ड्रामा - भाई जगताप - डॉ. आंबेडकर स्मारकावरून भाजपचा ड्रामा
भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून गेली सात वर्षे ड्रामा करत निवडणुका जिंकल्या असा घणाघात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.