ETV Bharat / city

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राला खास भेट

author img

By

Published : Aug 14, 2021, 5:31 PM IST

Updated : Aug 14, 2021, 5:40 PM IST

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेक स्पर्धेत एकमेव सुवर्णपदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याला अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा देण्यासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जे.जे. आर्टचा विद्यार्थी व प्रसिद्ध मोझ्यक कलाकार चेतन राऊत याने २१,००० पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब व ४ फुट रुंदीचे मोझ्यक पोर्ट्रेट तयार केले आहे.

Mosaic portrait of Olympic gold medalist Neeraj Chopra

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेक स्पर्धेत एकमेव सुवर्णपदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भालाफेक स्पर्धेत त्याने एक अतुल्य कामगिरी करत, विरोधी स्पर्धकांना धूळ चारत सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे संपूर्ण देशाला एक मोठ्या आनंदाचा क्षण अनुभवता आला. नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राला खास भेट
हा आनंद आणखीन द्विगुणीत करण्यासाठी व नीरज चोप्राला अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा देण्यासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जे.जे. आर्टचा विद्यार्थी व प्रसिद्ध मोझ्यक कलाकार चेतन राऊत याने २१,००० पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब व ४ फुट रुंदीचे मोझ्यक पोर्ट्रेट तयार केले आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी १२ तासांचा अवधी लागला. तसेच, ही कलाकृती साकारण्यासाठी कलाकार चेतन राऊत यांच्यासोबत मयूर अंधेर, सिद्धेश रबसे, तनवी गडदे, प्रमिला जंगले या तरुणांनीही सहभाग घेतला.

मोझ्यक पोर्ट्रेट तयार करताना कलाकार
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई करत इतिहास रचला आहे. नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा आणि बक्षिसांचा वर्षाव होत आहे. यासाठी नीरज याचे कौतुक करण्यासाठी एक आगळीवेगळी कलाकृती तयार करण्याचे ठरवले. २१,००० पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब व ४ फुट रुंदीचे मोझ्यक पोर्ट्रेट तयार केले आहे. कलाकृती साकारण्यासाठी 12 तासांचा अवधी लागला असे चेतन राऊत यांनी सांगितले.

Last Updated : Aug 14, 2021, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.