ETV Bharat / city

Nine Crores Fine : विनामास्क मुंबईकरांकडून तब्बल ८९ कोटींचा दंड वसूल - Mask in Mumbai

मुंबईत कोरोनाच्या ( Mumbai Corona Update ) तीन लाटा आल्या असून ओमायक्रॉन या व्हेरियंटचे ( Omicron Variant ) रुग्ण आढळून आले आहेत. विषाणूचा हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत, अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर पालिका, क्लिनअप मार्शल ( Cleanup Marshal ) तसेच पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ६८६ दिवसात तब्बल ४५ लाख ७ हजार ३७२ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८९ कोटी ६३ लाख ८ हजार ४७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

विनामास्क मुंबईकर
विनामास्क मुंबईकर
author img

By

Published : Feb 16, 2022, 3:45 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाच्या ( Mumbai Corona Update ) तीन लाटा आल्या असून ओमायक्रॉन या व्हेरियंटचे ( Omicron Variant ) रुग्ण आढळून आले आहेत. विषाणूचा हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरही जे नागरिक मास्क घालत नाहीत, अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकांवर, रेल्वे प्रवाशांवर ( Train Passengers ) पालिका ( BMC ), क्लिनअप मार्शल ( Cleanup Marshal ) तसेच पोलिसांकडून ( Police ) कारवाई करण्यात येत आहे. गेल्या ६८६ दिवसात तब्बल ४५ लाख ७ हजार ३७२ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८९ कोटी ६३ लाख ८ हजार ४७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

४५ लाख नागरिकांवर कारवाई - मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना विषाणूचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर विषाणूचा झपाट्याने प्रसार झाल्याने एप्रिल महिन्यापासून नागरिकांना मास्क लावण्याची सक्ती करण्यात आली. १७ एप्रिल, २०२० ते १५ फेब्रुवारी, २०२२ या ६८६ दिवसांत ४५ लाख ७ हजार ३७२ विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत ८९ कोटी ६३ लाख ८ हजार ४७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये पालिकेने ३५ लाख ८२ हजार ४८२ नागरिकांवर कारवाई करत ७१ कोटी १३ लाख ३० हजार ४७५ रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई पोलिसांनी ९ लाख ९९९ नागरिकांवर कारवाई करत १८ कोटी १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर रेल्वेमध्ये २३ हजार ८९१ नागरिकांवर कारवाई करून ४७ लाख ७८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा त्रिसूत्रीचे पालन करा - कोरोना किंवा इतर कोणत्याही विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी लस घेतली असली किंवा त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्या असल्या तरी त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ शकते. अशा नागरिकांना सौम्य लक्षणे होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, हात सतत स्वच्छ धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

हेही वाचा - Corona Patients Zero Death In Mumbai: मुंबईत कोरोना रुग्णांत शून्य मृत्यू; आयुक्तांनी मानले आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.