मुंबई - निवडणूक आयोगाने ( Election Commission ) उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह गोठवले ( Election symbol of Thackeray group frozen ) तसेच शिवसेना या शब्दालाही बंदी घातल्यानंतर पहिल्यांदा भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, निवडणुक आयोगाच्या या निर्णयाचं त्यांना अजिबात आश्चर्य वाटत नाही, मुंबई ते बोलत होते.
अंतिम निर्णयावेळी शिंदे यांची बाजू मजबूत असेल? याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडवणीस म्हणाले की, निवडणूक आयोगाने हा अंतरिम आदेश दिलेला आहे. हा अंतिम आदेश नाही आहे. यापूर्वीसुद्धा २०/२५ वर्षात अशी अवस्था अनेक वेळा झाली आहे. तेव्हा निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश दिला व त्यानंतर अंतिम निर्णय दिला आहे. परंतु जेव्हा निवडणूक आयोग या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय देईल तेव्हा, एकनाथ शिंदे यांची बाजू वरचढ ठरेल असा आत्मविश्वास सुद्धा देवेंद्र फडवणीस यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
मोदींच्या नाणं होत म्हणून आमदार, खासदार जिंकले - या सर्व प्रकरणामागे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बोलायला कोणी काहीही बोलू शकतं. शिवसेनेने निवडणूक आयोगाला आता जी नवीन नाव दिली आहेत, त्यामागे शरद पवार आहेत असाही आरोप केला जात आहे. मग त्यावर आपण काय बोलणार. त्याचप्रमाणे मोदींचे नाणं हे घासलेल, संपलेलं नाणं आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नोटबंदी नंतरच्या सर्व निवडणुका मोदींचं नाणं वापरूनच शिवसेना, उद्धव ठाकरे यांनी जिंकल्या आहेत. शिवसेनेचे १८ खासदार, ५६ आमदार हे सुद्धा मोदींजींच्या नाण्यानेच जिंकून आले आहेत. मोदींचं नाणं हे देशात खणखणीत वाजत आहे. तसेच ही माझी शेवटची लढाई असून ती आपणच जिंकणार असा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या अगोदर जेव्हा मी माझी शेवटची निवडणूक आहे असे वक्तव्य केलं होतं त्यावेळी चेष्टा करण्यात आली होती.
यापुढे सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातील ? भाजपच्या एकंदरीत वाटचालीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात तसेच देशात आमचं सरकार आहे. आम्ही आमचं काम व्यवस्थित करत आहोत. गोविंदा मध्ये आतापर्यंत तीन गोविंदाचा मृत्यू झाला आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही उत्सव थाटामाटात साजरे करा असं सांगितलं होतं, परंतु ते सांगताना सुरक्षेचे सर्व नियम पाळून उत्सव साजरे करायला पाहिजेत असेही सांगितलं होतं. परंतु आत्ता जे काही झालं आहे ते दुर्दैवी आहे. परंतु यानंतर जेव्हा असे उत्सव साजरे केले जातील तेव्हा सुरक्षेच्या सर्व नियमांच काटेकोरपणे पालण होत आहे की नाही हे सुद्धा बघितलं जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.