ETV Bharat / city

राज्य सरकारचे सर्व मंत्री बांधणार काळी फीत...कर्नाटकातील मराठी बांधवांच्या लढ्याला पाठिंबा

author img

By

Published : Oct 30, 2020, 6:56 AM IST

कर्नाटक राज्यातील सीमाभागातील 865 गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक बांधवांवर कर्नाटक राज्य सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करून त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य सरकारमधील सर्व कॅबिनेट तसेच राज्य मंत्री काळी फीत परिधान करून काम करणार आहेत.

मराठी भाषिक लढा
राज्य सरकारचे सर्व मंत्री बांधणार काळी फीत...कर्नाटकातील मराठी बांधवांच्या लढ्याला पाठिंबा

मुंबई - कर्नाटक राज्यातील सीमाभागातील 865 गावांमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक बांधवांवर कर्नाटक राज्य सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला पाठिंबा जाहीर करून त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य सरकार मधील सर्व कॅबिनेट तसेच राज्य मंत्री काळी फीत परिधान करून काम करणार आहेत.

भाषावार प्रांतरचनेनुसार 1 नोव्हेंबर 1956 दिवशी कर्नाटक या राज्याची स्थापना झाली. पण त्यावेळी मराठी भाषिक बहुल भाग बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी यासाहीत 865 गावे अन्यायकारक पद्धतीने कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आली. तेव्हापासून आजतागायत सीमा भागातील मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत.

याच पार्श्वभूमीवर दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी सीमा भागात काळा दिवस पाळण्यात येतो. त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी कॅबिनेटमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्याला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली असून कर्नाटकातील मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार उभं आहे, हे दाखवून देण्यासाठी सर्व मंत्री उद्या काळी फीत लाऊन या निषेध आंदोलनात सहभागी होणार असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.