ETV Bharat / city

डिलाईल पूलाच्या बांधकामाला विलंब का ?, रेल्वेने जनतेसमोर मांडावे - आदित्य ठाकरे

author img

By

Published : Apr 10, 2022, 7:08 PM IST

लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळील ( Lower Parel Railway Station ) डिलाईल पूल जीर्ण झाल्‍याने हा पूल रेल्‍वेने तोडला आहे. त्‍याचे ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्‍यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) रेल्‍वेला ( Railway ) निधी दिला आहे. तसेच, या पुलावर ना.म. जोशी मार्गावरुन येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम महानगरपालिका करत आहे. या कामांच्या प्रगतीची पाहणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

भेट देताना आदित्य ठाकरे
भेट देताना आदित्य ठाकरे

मुंबई - लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळील ( Lower Parel Railway Station ) डिलाईल पूल जीर्ण झाल्‍याने हा पूल रेल्‍वेने तोडला आहे. त्‍याचे ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्‍यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ( BMC ) रेल्‍वेला ( Railway ) निधी दिला आहे. तसेच, या पुलावर ना.म. जोशी मार्गावरुन येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा १ असे तिन्ही मिळून एकूण ६०० मीटर लांबीचे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम महानगरपालिका करत आहे. या कामांच्या प्रगतीची पाहणी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यावेळी ते म्हणाले, पुलाच्या बांधकामास विलंब होत आहे. याबाबत मी रेल्वे मंत्र्यांना पत्र दिले आहे. याबाबत बैठकाही झाल्या आहेत. त्यानंतरही पुलाच्या कामाला विलंब होत असल्याने, नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणाने रेल्वेच्या कामांना विलंब होतो आहे, ते रेल्वे प्रशासनाने जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Minister Aditya Thackeray ) यांनी मांडले आहे.

यावेळी आमदार सुनील शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, माजी मंत्री सचिन अहिर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कामाला होतो विलंब - डिलाईल पूल प्रकल्पामध्ये पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्गिकेवर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र, या कामासाठी विलंब होत असल्याबाबत प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, रेल्वेकडून हाती घेतलेल्या कामास होणाऱ्या विलंबाबत तसेच त्यास गती देण्याच्या अनुषंगाने मी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मात्र, त्यावर अद्याप उत्तर प्राप्त झालेले नाही. या कामाबाबत रेल्वेसोबत बैठकाही घेण्यात आल्या आहेत. रेल्वेकडून आता ३० ऑक्टोबर, २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची वेळ कळवली गेली आहे. रेल्वे प्रशासनाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेला पुढील काम हाती घेता येणे शक्य नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या तांत्रिक कारणाने रेल्वेच्या कामांना विलंब होतो आहे, ते रेल्वे प्रशासनाने जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. महानगरपालिकेच्या वतीने हाती घेतलेल्या पोहोच रस्त्यांसाठी आतापर्यंत आवश्यक काम गतीने करण्यात आले आहे. मात्र, रेल्वेने गर्डरचे बांधकाम पूर्ण केले तर महानगरपालिकेचे उर्वरित काम देखील तातडीने पूर्ण होईल, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

हेही वाचा - Silver Oak Attack : वकील गुणरत्न सदावर्ते यांची रवानगी एलटीटी मार्ग पोलीस ठाण्यात.. इतर आरोपी 'यलो गेट'ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.