मुंबई : जोगेश्वरी रेल्वे यार्ड ( Jogeshwari Railway Yard ) येथे सोमवारी सकाळी अमन शेख (२०) नामक तरुण हा ओव्हरहेड वायरला स्पर्श ( touching an overhead wire ) झाल्याने ८० टक्के भाजला ( man suffered 80 percent burns ) .
तो सेल्फी काढण्यासाठी लोकलच्या टपावर चढला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. त्यानुसार बोरिवली रेल्वे पोलीस ( Borivali Railway Police ) अधिक तपास करत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख जोगेश्वरी स्टेशनच्या बाहेरील एरिया शॉपमध्ये लोडिंग-अनलोडिंग एजंट म्हणून काम करतो.
जिथून फ्लिपकार्टवर पार्सल ऑर्डर वितरित केल्या जातात. शेख सोमवारी पहाटे साडेपाच वाजता तो ड्यूटीवर हजर झाला. मात्र, कोणतेही काम नसल्याने तो सकाळी साडेनऊ वाजता दुकानातून बाहेर पडला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी जोगेश्वरी आवारात पॉइंट मॅनला मोठा आवाज आला. त्यावेळी राममंदिर ते जोगेश्वरी स्थानकादरम्यानच्या रुळांच्या पूर्वेकडे त्यांनी धाव घेतली. तेव्हा शेख त्यांना जमिनीवर पडलेला दिसला.