मुंबई- राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे भाजपचे नेते किरीट सोमैय्या हे अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. दोन्ही मंत्र्यांनी सोमौय्या यांच्याविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहेत. अनिल परब यांच्याकडून किरीट सोमैय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. तर हसन मुश्रीफ हे किरीट सोमय्या यांच्यावर 150 कोटींच्या फौजदारी दावा करणार आहेत.
पत्रकार परिषद घेऊन मंत्र्यांवर आरोप करणाऱ्या किरीट सोमैय्या यांना आता कायदेशीर लढाईदेखील लढावी लागणार आहे. त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्यास याचे गंभीर परिणाम दोन्ही मंत्र्यांना भोगावे लागतील. मात्र, न्यायालयात हे आरोप सिद्ध न झाल्यास याचा मोठा फटका किरीट सोमैय्या यांनादेखील बसणार आहे. दाव्यात केलेली रक्कम किरीट सोमैय्या यांना भरावी लागेल. तसेच फौजदारी दावा दाखल केल्यामुळे रक्कम भरण्यासहित किरीट सोमैय्या यांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ नितीन सातपुते यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा-अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका
किरीट सोमय्या यांचे मंत्र्यांवर आरोप
हेही वाचा-महंत गिरी यांच्या मृत्यूने अध्यात्मिक क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान- योगी आदित्यनाथ
अनिल परब यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा दावा दाखल-
सचिन वाजे प्रकरणांमध्ये परिवहन मंत्री अनिल परब यांचा संबंध असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला होता. या प्रकरणात जमा झालेले पैसे अनिल परब यांनी घेतल्याचा त्यांनी दावा केला होता. परिवहन मंडळामध्ये बदल्यांचे रॅकेट सुरू आहे. याला परिवहन मंत्र्याचा आश्रय असल्याचा आरोपदेखील सोमैय्या यांनी केला होता. याविरोधात अनिल परब यांनी 100 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.