ETV Bharat / city

ईटीव्ही विशेष : सक्रिय रुग्णांच्या संख्येत केरळ तर रुग्णसंख्या, मृत्यू, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र एक नंबरवर - महाराष्ट्र कोरोन रुग्ण संख्या बातमी

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून महाराष्ट्रात कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत आघाडीवर राहिला आहे. गेल्या अकरा महिन्यात महाराष्ट्र्रात 20 लाख 52 हजार 905 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये 9 लाख 88 हजार 655 रुग्ण असून केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 9 लाख 44 हजार 57, आंध्रप्रदेशमध्ये 8 लाख 88 हजार 692, तामिळनाडूमध्ये 8 लाख 43 हजार 690, दिल्लीमध्ये 6 लाख 36 हजार 529, उत्तर प्रदेशमध्ये 6 लाख 1 हजार 898, पश्चिम बंगालमध्ये 5 लाख 72 हजार 32 एकूण रुग्ण आहेत.

corona
कोरोना रुग्ण संख्या
author img

By

Published : Feb 13, 2021, 12:10 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रसार भारतात गेल्यावर्षापासून सुरू झाला. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. मात्र, केरळमध्ये यात अचानक मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत केरळ एक नंबरवर गेला आहे. तर एकूण रुग्णसंख्या, मृत्यू आणि रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र एक नंबरवर आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये केरळ एक नंबरवर -
भारतात 12 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार एकूण 1 कोटी 8 लाख 80 हजार 603 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 5 लाख 89 हजार 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 लाख 55 हजार 447 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर सध्या 1 लाख 35 हजार 926 सक्रिय रुग्ण आहेत. भारतात केरळमध्ये सर्वाधिक 64 हजार 180 सक्रिय रुग्ण आहेत. तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात 31 हजार 437 सक्रिय रुग्ण आहेत. कर्नाटकमध्ये 5 हजार 977, पश्चिम बंगलामध्ये 4 हजार 313, तामिळनाडूमध्ये 4 हजार 294, छत्तीसगडमध्ये 3 हजार 475, उत्तर प्रदेशमध्ये 3 हजार 320, पंजाबमध्ये 2 हजार 224 सक्रिय रुग्ण आहेत.

दादरा नगर हवेलीमध्ये शून्य रुग्ण आहेत. त्रिपुरामध्ये 3, अरुणाचल प्रदेशमध्ये 5, अंदमान निकोबारमध्ये 13, मिझोराममध्ये 21, लडाखमध्ये 52, मणिपूरमध्ये 53, सिक्कीममध्ये 62, लक्षद्वीपमध्ये 68, नागालँडमध्ये 89 सक्रिय रुग्ण आहेत.

एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र एक नंबरवर-
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून महाराष्ट्रात कोरोना रुग्ण आणि मृतांच्या संख्येत आघाडीवर राहिला आहे. गेल्या अकरा महिन्यात महाराष्ट्र्रात 20 लाख 52 हजार 905 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये 9 लाख 88 हजार 655 रुग्ण असून केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 9 लाख 44 हजार 57, आंध्रप्रदेशमध्ये 8 लाख 88 हजार 692, तामिळनाडूमध्ये 8 लाख 43 हजार 690, दिल्लीमध्ये 6 लाख 36 हजार 529, उत्तर प्रदेशमध्ये 6 लाख 1 हजार 898, पश्चिम बंगालमध्ये 5 लाख 72 हजार 32 एकूण रुग्ण आहेत.

मृतांच्या संख्येतही महाराष्ट्र आघाडीवर -
देशभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एकूण 51 हजार 415 मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूमध्ये 12 हजार 402, कर्नाटकमध्ये 12 हजार 251, दिल्लीमध्ये 10 हजार 886, पश्चिम बंगालमध्ये 10 हजार 225 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिझोराममध्ये 9 तर दादरा नगर हवेलीमध्ये 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. लक्षद्वीपमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

रुग्ण बरे होण्याच्या संख्येत महाराष्ट्र एक नंबरवर -
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत महाराष्ट्र एक नंबरवर आहे. महाराष्ट्रात 19 लाख 70 हजार 053 रुग्ण बरे झाले आहेत. त्याखालोखाल कर्नाटकमध्ये 9 लाख 25 हजार 829, केरळमध्ये 9 लाख 20 539, आंध्रप्रदेशमध्ये 8 लाख 80 हजार, तामिळनाडूमध्ये 8 लाख 26 हजार 994, दिल्लीमध्ये 6 लाख 24 हजार 592, उत्तर प्रदेशमध्ये 5 लाख 89 हजार 882, पश्चिम बंगालमध्ये 5 लाख 57 हजार 494 रूग्ण बरे झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.