ETV Bharat / city

बलात्कार, ॲसीड हल्ला, बालकांवरील अत्याचारांना मृत्युदंड, असे आहे शक्ती विधेयक.. - महाराष्ट्र शक्ती कायदा

विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात बहुचर्चित असे शक्ती विधेयके आज विधासनभेत सादर करण्यात आले. काय आहे या विधेयकात, जाणून घेऊया... यात महिलांवरील बलात्कार, ॲसीड हल्ला, बालकांवरील अत्याचारांना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे...

Maharashtra Govt Shakti Law to be presented at Winter session see more information
काय आहे अधिवेशनात मांडण्यात येणारा 'शक्ती कायदा'?
author img

By

Published : Dec 14, 2020, 11:43 AM IST

Updated : Dec 15, 2020, 9:01 AM IST

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनात बहुचर्चित असे शक्ती विधेयक मांडण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे विधेयक विधानसभेत हे विधेयक मांडले. महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 अशी दोन विधेयके विधिमंडळात मांडण्यात आली. यामुळे महिलांवरील अत्याचाराली खिळ बसण्यास मदत होणार आहे.

आंध्रच्या 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर असणार शक्ती कायदा..

महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा कायदा केला आहे. या कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कायदा करण्याच्या दृष्टीने दिशा कायदा समजून घेण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यासह संजय कुमार आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आंध्रप्रदेशला भेट दिली होती. आंध्रप्रदेशच्या दिशा कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी विधेयकाचा मसुदा करण्याकरिता महाराष्ट्र पोलीस अकाडमी नाशिक येथील संचालक अश्वथी दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने तयार केलेल्या उपरोक्तप्रमाणे दोन विधेयकांचे मसुदे मंत्रिमडळासमोर 12 मार्च 2020 रोजी ठेवण्यात आले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकांची सखोल तपासणी करून विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी मंत्रिमडळ उप समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली होती. मंत्री अनिल देशमुख, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जयंत पाटील, मंत्री यशोमती ठाकूर, मंत्री वर्षा गायकवाड हे या समितीचे सदस्य होते.

भाजप आमदार श्वेता महाले यांची प्रतिक्रिया..
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची प्रतिक्रिया..

प्रस्तावित कायद्यांची ठळक वैशिष्टे पुढीलप्रमाणे आहेत -

१) नवीन गुन्हे परिभाषित केले आहेत.

2) समाज माध्यमांमधुन महिलांना धमकावणे व बदनामी करणे.

3) बलात्कार, विनयभंग आणि ॲसीड हल्ल्याबाबत खोटी तक्रार करणे.

4) समाजमाध्यम, इंटरनेट व मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी तपास कार्यात सहकार्य न करणे.

5) एखाद्या लोकसेवकाने तपासकार्यात सहकार्य न करणे.

6) बलात्कार पिडितेचे नाव छापण्यावर बंधने होती ती बंधने विनयभंग आणि ॲसीड हल्ल्याबाबतही लागू करणे.

इतर वैशिष्टे..

  • शिक्षेचे प्रमाण वाढविले आहे.
  • बलात्कार, ॲसीड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंड प्रस्तावित केला आहे.
  • शिक्षांचा कालावधी वाढविला आहे.
  • ॲसीड हल्ल्याप्रकरणी दंडाची तरतुद केली असून ती रक्कम पिडितेला वैद्यकीय उपचार व प्लास्टीक सर्जरीकरिता देण्याचे प्रस्तावित आहे.
  • फौजदारी प्रक्रियेमध्ये बदल सुचवला आहे.
  • तपासाचा कालावधी दोन महिन्यांवरून 15 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.
  • खटला चालविण्याचा कालावधी दोन महिन्यांवरून 30 कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांचा केला आहे.
  • अपिलाचा कालावधी सहा महिन्यांवरून ४५ दिवसांचा केला आहे.
  • नवीन न्यायालयीन व्यवस्था प्रस्तावित केली आहे.
  • 36 अनन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
  • प्रत्येक अनन्य विशेष न्यायालयासाठी विशेष शासकीय अभियोक्ता नेमण्याचे प्रस्तावित आहे.
  • प्रत्येक घटकामध्ये महिला व बालकांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी (जिल्हा अधीक्षक/आयुक्तालय) विशेष पोलीस पथक, ज्यामध्ये किमान एका महिला अधिकाऱ्याचा समावेश असेल, नेमण्याचे प्रस्तावित आहे.
  • पिडितांना मदत व सहकार्य करण्यासाठी सेवाभावी संस्थांना अधिसूचित करण्याचे प्रस्तावित आहे.

हेही वाचा : 'शक्ती' कायद्याला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्याने महिला संघटनांचा जल्लोष; पेढे वाटून सरकारचे मानले आभार

Last Updated : Dec 15, 2020, 9:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.