मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. आज शुक्रवारी (दि. २० ऑगस्ट) ४ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १०५ मृत्यूंची नोंद झाली असून ६ हजार ३८४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ५५ हजार ४५४ सक्रिय रुग्ण -
राज्यात ६ हजार ३८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख २१ हजार ३०५ कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ४ हजार ३६५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ६७२ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी १९ लाख २१ हजार ७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख १५ हजार ९३५ (१२.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख २२ हजार २२१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात ५५ हजार ४५४ सक्रिय रुग्ण आहेत.
महिन्याभरात कोणत्या दिवशी झाले किती मृत्यू? -
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
'कुठे' आहेत मोठ्या प्रमाणात रुग्ण?
- मुंबई - ३१९
- रायगड - ५९
- पनवेल पालिका - ५९
- अहमदनगर - ५७७
- पुणे - ५२१
- पुणे पालिका - २०१
- पिंपरी चिंचवड पालिका - १६०
- सोलापूर - ४१५
- सातारा - ५५४
- कोल्हापूर - १४१
- सांगली - ४६९
- सांगली मिरज कुपवाडा पालिका - ८६
- सिंधुदुर्ग - ८२
- रत्नागिरी - ८६
- उस्मानाबाद - ५२
- बीड - १०१
हेही वाचा - ...तर कोरोनाच्या तिसर्या लाटेलाही भाजपा कारणीभूत ठरणार - नवाब मलिक