ETV Bharat / city

MAHARSHTRA BREAKING : दिल्लीत संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात बैठक, राऊतांनी ट्विट करून दिली माहिती

author img

By

Published : Aug 2, 2021, 8:56 AM IST

Updated : Aug 2, 2021, 10:35 PM IST

maharashtra breaking news and todays live updates

22:27 August 02

दिल्ली -  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीट करून दिली आहे. राहूल गांधी यांच्याशी आज भेट झाली. गांधी यांच्याशी महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय राजकारणावर सविस्तर चर्चा झाली. राज्य सरकारच्या कामा विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेची जडणघडण तसेच कार्यपद्धती बाबत त्यांनी जाणून घेतले, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

20:36 August 02

मुंबई - राज्यात जातिनिहाय जनगणना करण्याचा ठराव राज्य मागासवर्गीय आयोगाने केला आहे. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर हा ठराव करण्यात आला. 

19:20 August 02

मुंबई - राज्यातील लॉकडाऊन शिथील करण्यात आले असून रुग्ण संख्या कमी होत असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र, ११ जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम कायम राहणार आहे. तर दुकाने आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच स्पा, जिम, सलून, ब्युटी पार्लरला ५० टक्क्यांनी चालवण्यास संमती देण्यात आली आहे. 

18:32 August 02

maharashtra breaking
परिपत्रक
  • मुंबई -  उद्या दुपारी 4 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार असल्याची माहिती माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोनामुळे बारावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

17:31 August 02

  • मराठा आरक्षण उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू झाली असून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे या बैठकीला उपस्थित आहेत.

16:00 August 02

परमबीरसिंह खंडणी प्रकरण

  • आज ठाणे न्यायालयात सुनील देसाईयांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नाकारला आहे. तर कंत्राटदार विकास दाभाडे याचा जमीन अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता खंडणी प्रकरणात आरोपींना अटक होणे हा पर्याय आहे.

14:02 August 02

  • राज कुंद्रा यांनी अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भातील निकाल उच्च न्यायालयाने राखीव ठेवला आहे.

14:00 August 02

नाशिक शहरातील पाणी कपात रद्द...

गंगापूर धरणात मुबलक पाणी साठा असल्याने महापालिकेचा निर्णय, आयुक्त कैलास जाधव यांनी याबाबतची माहिती

 दिली, या निर्णय़ामुळे नाशिकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

12:21 August 02

ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता - विजय वडेट्टीवार

नागपूर - देशातील १० कोरोनाबाधित राज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. कोरोना अद्याप संपला नाही. तसेच ऑगस्टच्या शेवटी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना प्रतिबंधात्मक निर्णय शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळामध्ये चर्चा सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्कफोर्ससोबत चर्चा करून अंतिम निर्णय घेतील अशी माहिती मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभमीवर सरकार सावध पावलं टाकते असल्याचेही ते म्हणाले.

  • - देशातील ओबीसी नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न
  • - बजेटमध्ये ओबीसी संख्येनुसार निधी मिळावा, यासह इतर ओबीसींच्या प्रश्नासाठी, केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी देशातील ओबीसी नेत्यांची मोट बांधणार
  • - एमपीएसची परिक्षेबात मागणी आली, ती मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे.
  • - आज मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर आहे, हा शेवटचा दौरा आहे. कॅबीनेट मध्ये चर्चा होऊन १० हजार देणार.

12:18 August 02

सात वर्षीय पुतणीवर काकाकडून अत्याचाराचा प्रयत्न, आरोपीस नागरिकांनी चोपले

नागपूर - शहरात एका  सात वर्षीय पुतणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांनी चोप दिला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी दारूच्या नशेत महिलांसोबत गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या जात होत्या. त्यानंतर आज हा प्रकार समोर आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

12:13 August 02

नागपूरच्या हुडकेश्वर भागात ब्राऊन स्पेक्टकल्ड कोब्रा जातीच्या सापाची आढळली 16 पिल्ली

नागपूर - नागपूरच्या हुडकेश्वर भागातील म्हाळगी नगरमध्ये ब्राऊन स्पेक्टकल्ड कोब्रा या विषारी जातीच्या नागाची आढळली 16 पिल्ले. विदर्भात याला गव्हाऱ्या नाग म्हणून ओळखले जाते, काही दिवसापूर्वीचा या भागात याच जातीचा नाग निघाला होता. त्यावेळी सर्पमित्रांना बोलावून त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले होते. त्यानंतर आता याच परिसरात 16 पिल्लं निघाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

गव्हाऱ्या नाग प्रामुख्याने उंदीर किंवा किडे खातो, अति विषारी नाग म्हणून हा प्रसिद्ध आहे. सर्पमित्रांनी 16 ही पिल्लं ताब्यात घेतली असून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार आहे.

11:17 August 02

अनिल देशमुख यांना ई़डीचे समन्स, देशमुखांनी पुन्हा पाठवले पत्र, उपस्थितीची शक्यता कमी

ED ने पाचव्यांदा समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल देशमुख चौकशी साठी ED कार्यालयात हजर राहण्याची शक्यता कमी आहे. ECIR ची कॉपी देण्यात यावी, त्यांना जी कागद पत्र हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे ED ला अनिल देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख ED कार्यालयात येण्याची शक्यता कमी आहे.

 मात्र संबंधित गुन्ह्यांची माहिती मिळावी असं पत्र अनिल देशमुख यांनी ED लिहिलं आहे.

10:40 August 02

खावटी वाटप करताना एकाच खोलीत शकडो आदिवासीची गर्दी, कोरोनाचे नियम धाब्यावर

नागपूर -  एका अंधाऱ्या खोलीत शेकडो आदिवासी बांधवांना एकत्र थांबवल्याचा प्रकार जिल्ह्यातील रामटेकमधील समोर आला आहे. आदीवासी विभागाकडून कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यचा हा प्रकार आदीवासींना खावटी वाटप करताना घडला आहे. या प्रकरणी रामटेकचे आमदार आशिष जैसवाल अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत त्यांना झापले आहे.

10:22 August 02

ऑलम्पिकमध्ये महिला हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक, ऑस्टेलियास 1-0 ने चारली धूळ

मुख्यमंत्रीा
महिला हॉकी संघाची दमदार कामगिरी

10:06 August 02

सोळा कोटींचे इजेक्शन देऊन देखील वेदिकाचा झाला मृत्यू, प्रयत्न निरर्थक

10:00 August 02

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर विमानतळावर दाखल, आज सांगली जिल्ह्याचा पाहणी दौरा

maharashtra breaking
maharashtra breaking

सांगली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यासाठी ते मुंबईहून कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले आहेत. आज ते सांगलीतील पूरग्रस्त भागातील नुकसानीचा आढावा घेतील

09:08 August 02

शिवसेनेतील बाटग्यांच्या महामंडळाची यादी तशी लांब आहे..- नितेश राणे

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचे वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र सामनामधून भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला, त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी देखील शिवसेनेतील बाटग्यांचे महामंडळची यादी तशी लांब आहे, असे म्हणत काही नेत्या्ंच्या नावांचा समावेश करत ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली आहे. 

07:19 August 02

पुणे- आपल्या लेकीला दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी पुण्यातील वेदिकाच्या आई-वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. तिला परदेशातून मागवलेले तब्बल सोळा कोटीचे इंजेक्शनही दिले. मात्र आज अचानक त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वेदिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Last Updated : Aug 2, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.