पुष्पक एक्सप्रेसमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून इतर तिघांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.
BREAKING : पुष्पक एक्सप्रेस सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 जणांना अटक, तिघांचा शोध सुरू - cm thackeray and rane
22:34 October 09
पुष्पक एक्सप्रेस सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 जणांना अटक, तिघांचा शोध सुरू
22:32 October 09
महिलेने सॅनिटरी नॅपकीनमधून आणले होते ड्रग्स - एनसीबी
ड्रग्स पार्टी प्रकरणात एका महिला आरोपीने सॅनिटरी नॅपकीनमधून शिपवर ड्रग आणले होते असा खुलासा एनसीबीने केला आहे.
20:12 October 09
फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांचे सीबीआयचे संचालक सुबोध जैस्वाल यांना समन्स
- सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना आयपीएस ट्रान्सफरच्या फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने समन्स पाठवले आहे
- "रश्मी शुक्ला" फोन टॅपिंग केस प्रकरणी सायबर सेल अधिकृत गुप्त कायदा अंतर्गत या प्रकरणाचा तपास करत आहे.
- सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना 14 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
20:00 October 09
ड्रग्स पार्टी प्रकरण : आणखी एका ड्रग पेडलरला अटक; अटकेतील एकूण संख्या 19 वर
एनसीबीने ड्रग्स ऑन क्रूझ प्रकरणात चौकशी केल्यानंतर एका ड्रग पेडलरला अटक केली आहे. या प्रकरणातील एकूण अटकेची संख्या 19 वर गेली आहे.
18:58 October 09
सात तासांच्या चौकशीनंतर चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री एनसीबी कार्यालयातून बाहेर
- फिल्म प्रोड्युसर इम्तियाज खत्री एनसीबी कार्यालयातून बाहेर आले
- जवळजवळ 7 तासांहून अधिक वेळ एनसीबीकडून खत्री यांची कसून चौकशी
- काल क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीने चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या कार्यालयावर छापेमारी केली होती
- अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव पुढे आले त्यानंतर एनसीबीने कारवाई केली
18:03 October 09
मुंबई गुन्हे शाखेची परमबीर सिंग यांना चौकशीची नोटीस

- 12 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी परमबीर सिंग यांना नोटीस
- हरियाणाच्या निवासस्थानासह मुंबईतील नीलिमा येथील निवासस्थानीही पाठविली नोटीस
- गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग, सचिन वाझे आणि इतरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे
16:40 October 09
एनसीबीच्या समन्सनंतर शाहरूखचा ड्रायव्हर चौकशीसाठी हजर
- शाहरुख खानचा ड्रायव्हर चौकशीसाठी एनसीबी कार्यलयात उपस्थित आहे
- क्रूझ पार्टीला जाण्यासाठी याच ड्रायव्हरने आर्यनला सोडलं होतं, अशी माहिती मिळत आहे.
- याच संदर्भात चौकशी करण्यात येत आहे.
-आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट हे दोघे पार्टीला एकत्र गेले होते.
-अरबाजजवळ चरस नावाचे ड्रग्ज सापडले होते. या सगळ्या कड्या जुळवून पाहण्यासाठी तसेच काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी ड्रायव्हर सध्या एनसबीच्या ऑफिसमध्ये आहे.
- त्याला समन्स बजावण्यात आलं आहे. त्याची सध्या चौकशी सुरु आहे.
14:18 October 09
आजचा क्षण आदळाआपट कऱण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे - उद्धव ठाकरे
आजचा क्षण आदळाआपट कऱण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे
ज्योतिरादित्य सिंदिया यांना मराठीचा आदर
मराठी मातीत बाभळी उगवल्या तरी त्या जोपसावे लागतेच, राणेंना टोला
गोवाच्या विरोधात नाहीत पण तसेच आपल्याकडे असलेल्या वैभव आहे, मग विमानतळाला एवढे दिवस का लागले, असा टोला नारायण राणेंना लगावला
मळमळणीने बोलणे हे वेगळे असते, राणेंना टोला
कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात राजकारण येणार नाही- ठाकरे
कोकणातील चिपी विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावे, हेलिपॅडही सुरू करण्यासाठी सिंदियांनी मदत करावी- ठाकरे
14:10 October 09
तीन दशकाचे स्वप्न पूर्ण झाले, हा सिंधुदुर्ग आणि कोकणाच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू झाला - सिंदिया
गोव्याची प्रसिद्धी सिंधुदुर्गाला मिळवून द्यायची आहे
रोज मुंबई- सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू झाली
हैदराबाद पुणे, मुंबई या ठिकाणाहून सिंधुदुर्गसाठी विमान सेवा सुरू करू
पुढील पाच वर्षात सिंधुदुर्गातून 27 ते 28 विमाने दररोज झेपावली पाहिजेत, असा प्रयत्न आपण करू
पाच पक्षाचे सदस्य या उद्घाटनासाठी आहोत... याचा अर्थ आम्ही एकत्र होऊन काम करणार आणि असंभव कामही तडीस लागणार - सिंदिया
विमानाच्या इंधनावरील व्हॅट हटवा, विकासासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा - सिंदिया
13:06 October 09
चिपी विमानतळ लोकार्पण सोहळा
खासदार विनायक राऊत यांच्याकडून सर्वांचे स्वागत
राणे ठाकरे बसले शेजारी शेजारी, राणेंनी ठाकरेंकडे पाहणे टाळले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती
दिल्लीतून ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले दिपप्रज्वलन केले
उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, यांची उपस्थिती
ज्योतिरादित्य शिंदे यांची मराठीतून सुरुवात
महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांच्याबद्दल सुभाष देसाई यांच्याकडून उल्लेख
उद्धव ठाकरेंच्या पायगुणामुळे चिपी विमानतळाचे उद्घाटन,
विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नामुळे चिपी विमानतळ साकारले- सुभाष देसाई
कोकणाच्या विकासाची वाटचाल आता सुरू झाली आहे- देसाई
13:00 October 09
मुख्यमंत्री ठाकरे, नारायण राणे आणि पहिले प्रवासी विमान चिपी विमानतळावर दाखल
चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत
12:40 October 09
जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात आंदोलन
जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकले जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. शहरातील बी.जे.मार्केटमध्ये असलेल्या प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. आम्ही अजित पवारांच्या भगिनी असून प्राप्तिकर विभागाने आमच्यावर देखील धाडी टाकाव्या असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. आंदोलनात राष्ट्रवादीच्या मंगला पाटील, कल्पिता पाटील, अश्विनी देशमुख व इतर महिला सहभागी झाल्या आहेत.
12:09 October 09
कोणाच्या फोनवरून क्रुझवरील 3 जणांना एनसीबीने का सोडून दिले? याचे उत्तर द्यावे
1300 लोकांच्या जहाजावर तुम्ही छापा मारला.. मग त्यातील निवडक 11 लोकांना तुम्ही कारावाईसाठी ताब्यात घेतले..
वृषभ सचदेवा भाजप नेत्याचा नातेवाईक,
भाजप नेत्याचा कॉल आल्यानंतर त्या पकडेलल्या लोकांपैकी तिघांना का सोडले?
समीर वानखेडे यांचे दिल्लीत कोणाशी संबंध
मग त्यातील तीन लोकांना तुम्ही का सोडले याचे उत्तर एनसीबीने द्यावे
माझ्या जावायला अटक केली म्हणून मी आरोप करत नाही - मलिक
दरेकर यांनी चौकशी समितीची मागणी करावी
मुंबई पोलिसांनी समिर वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड तपासावे
व्हाटस्अॅप चॅटवर कारवाई पुढे जात आहे...
ज्या लोकांनी आर्यन खानला जहाजावर आणले त्यांनाच सोडून दिले
11:52 October 09
जालना: सलग 3 दिवस भगरीच्या सेवनाने विषबाधेच्या घटना, नवरात्रीत उपवास करणाऱ्यांमध्ये खळबळ
जालन्यातील वडीगोद्री गावात भगर खाल्ल्याने सलग ३ दिवसांपासून १४ रूग्णांना विषबाधा झालीय. यातील १२ रुग्णांना आतापर्यंत दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली असून दोन रुग्णांवर अजूनही खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गुरवारी- ७, शुक्रवारी ६ आणि आज(शनिवारी) पुन्हा एका रुग्णाला भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याने नवरात्रीत उपवास धरणाऱ्या भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळी भगर खाल्ल्याने ४५ वर्षीय सौमित्रा काळे या महिलेला विषबाधा झाली असून त्यांच्यावर वडीगोद्रीतील माऊली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.भगरीतून सतत विषबाधा होत असल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन किराणा दुकानांमधून ३८ किलो भगर जप्त केली आहे.या भगरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
10:54 October 09
धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर बलात्कार
ठाणे ब्रेकिंग -
धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर बलात्कार, दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी केली अटक
10:31 October 09
नंदूरबार आयर्न साखर कारखान्यावर 56 तासापासून आयकर विभागाची चौकशी सुरूच....
नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयर्न साखर कारखान्यावर 56 तासापासून आयकर विभागाची चौकशी सुरूच....
चौकशीबाबत कारखाना प्रशासन व आयकर विभागात कडून गोपनियता...
आयकर विभागाच्या कर्मचार्यांकडून कारखान्यातील संगणक जप्त...
कारखाना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कारखान्यात कुठल्याही व्यक्तीला प्रवेश नाही...
कारखाना कार्यालयात कर्मचाऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे सीआरपीएफ चे जवान तैनात...
09:54 October 09
औरंगाबाद विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ- कुलगुरू
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी जाहीर केला.
09:50 October 09
नागपुरातील एकाच्या घरात स्फोट, तीन जण जखमी
नागपूर - चितार ओळ परिसरात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट कशामुळे झाला घरातील गॅस सिलिंडरमुळे झाला की अन्य कारण याची माहिती अस्पष्ट आहे
गजानन रामाजी बिंड यांच्या घरी हा स्फोट झाला असून 3 जण जखमी झाले आहे. गजानन बिंड, उर्मिला बिंड, आरती बिंड अशी जखमींची नावे आहेत.
चितार ओळ गांधी पुतळा येथील बिंड यांच्या घरी पहाटे 5.30 ब्लास्ट झाला यामध्ये बिंड यांच्या घरातले हॉल, स्वयंपाक घराचे आणि घरातील साहित्याचे नुकसान
09:24 October 09
कोल्हापूर फ्लॅश - नवरात्र उत्सव काळात vip व्यक्तीकडून नियमांचे उल्लंघन
कोल्हापूर फ्लॅश
नवरात्र उत्सव काळात vip व्यक्तीकडून नियमांचे उल्लंघन
मंदिर परिसरात चप्पल घालून प्रवेश केल्याने भाविकांत संताप
Vip व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची भक्तांची मागणी
कर्त्यव्यात कसूर करणाऱ्या देवस्थान समिती अध्यक्ष, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
राजवाडा पोलीस ठाण्यात भक्तांनी दिले निवेदन
09:11 October 09
अमरावती ब्रेकींग - तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात डीजे वाजवल्याचे प्रकरणी ठाणेदारासह बारा पोलिसांना एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची नोटीस
अमरावती ब्रेकींग
तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात डीजे वाजवल्याचे प्रकरण
ठाणेदारासह बारा पोलिसांना एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची नोटीस
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची माहिती
कोरोना नियम धाब्यावर बसवून पोलीस ठाण्यात डीजे वाजवल्याचे प्रकरण अंगलट
गणपती उत्सवात पोलीस ठाण्यातच डिजे वाजवून पोलिसांनी केला होता झिंगाट डान्स
09:05 October 09
पुण्यात अजित पवार यांच्या बहिणीच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी सुरूच
09:03 October 09
चिपी विमानतळ परिसरात एसआरपीएफ पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
चिपी विमानतळ परिसरात एसआरपीएफ पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात, आज चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकत्र येणार आहेत.
08:54 October 09
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आज एनसीबीच्या कारवाईचा करणार भांडाफोड?
मुंबई - राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईचा करणार भांडाफोड. राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन. भाजपाचे कार्यकर्ते एऩसीबीच्या कारवाईत सहभागी असल्याची माहिती मलिक यांनीच पुढे आणली होती. त्यानंतर या प्रकरणाचे एनसीबीने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी मलिक यांनी केली होती.
08:13 October 09
क्रूझ जहाज ड्रग्ज प्रकरण - वांद्रेत चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापा
क्रूझ जहाज ड्रग्ज प्रकरण - मुंबईतील वांद्रे भागात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा (NCB) छापा.
08:03 October 09
येवल्यात कापड दुकानास आग, अग्निशामक दलाने शर्तीच्या प्रयत्नाने विझवली आग

येवला शहरातील शिंपी गल्ली भागातील अशोक गुजराथी यांच्या कापड दुकानात आग लागली. स्थानिकांनी बघताच अग्निशामक दलास फोन केला. त्वरित अग्निशामक दल घटनास्थळी येऊन दुकानाची आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये कापड दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग बघण्यास एकच गर्दी झाली होती.
07:44 October 09
Breaking Updates
मुंबई - गोरेगावातील आरे कॉलनीत बिबट्याचा वावर वाढला आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने एका मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.