ETV Bharat / city

Maha Education Level Decrease : शिक्षणाचा दर्जा खालावला, एनसीईआरटीच्या अहवालात महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर - महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज

राज्यात राजकिय अस्थिरता असतानाच आता महाराष्ट्राचा शैक्षणिक क्षेत्रातील दर्जा खालावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा डंका सातत्याने वाजवला जात असला तरी शैक्षणिकदृष्ट्या मात्र महाराष्ट्र आता १० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. ( Maha Education Level Decrease )

Maha Education Level Declined
महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा
author img

By

Published : Jul 28, 2022, 4:22 PM IST

Updated : Jul 28, 2022, 5:17 PM IST

मुंबई - महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. राज्य शैक्षणिक दर्जाबाबत आता दहाव्या क्रमांकावर ( Maharashtra Education Level Decrease ) आहे. तर शैक्षणिक गुणवत्तेच्याबाबतीत राजस्थान देशपातळीवर तिसरा आणि मध्यप्रदेश पाचव्या स्थानांवर पोहचला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन परिषदेच्या (एनसीईआरटी) नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालातुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीईआरटी मार्फत देशातील विविध राज्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी दरवर्षी अशा प्रकारचे सर्वेक्षण केले जाते. महाराष्ट्र आता १० व्या क्रमांकावर फेकला गेला ( Maharashtra Ranks 10th in NCERT Report ) आहे. तर अन्य राज्यांनी अनपेक्षितरित्या प्रगती केल्याची माहिती एनसीईआरटीने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात स्पष्ट झाली असून ही बाब चिंताजनक असल्याचे राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी सांगितले.

कसे केले जाते सर्वेक्षण ? २०२१ मध्ये २७ राज्ये आणि केंद्र प्रदेशातील १ लाख १८ हजार २७४ शाळांमधील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीमधील ३४ लाख १ हजार १५८ विद्यार्थी आणि ५ लाख २६ हजार ८१४ शिक्षकांशी संपर्क करून हा अहवाल तयार करण्यात आला होता. या सर्वेक्षणात भाषा, गणित आणि पर्यावरण विषयांवर आधारीत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावरून विविध राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचे क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार देशात पंजाबने पहिला क्रमांक पटकाला आहे.

कोणत्या राज्याला किती गुण ? एनसीईआरटीच्या गुणवत्तेनुसार पंजाबला ५९.३८ टक्के गुण मिळाले आहेत. तर चंदीगड ५५.१३, राजस्थान ५४.८३, जम्मू-काश्मीर ५०.३०, मध्यप्रदेश ४९.९८, पोंडीचेरी ४९.९३, मणीपुर ४९.४५, हरियाणा ४९.४०, पश्चिम बंगाल ४९.३५, महाराष्ट्र ४९.०५, केरळ ४८.७८, गुजरात ४७.९८, गोवा ४७.७८, ओरिसा ४७.५५, आसाम ४७.४३, लक्षदीप ४७.००, अंदमान आणि निकोबार ४६.८३, कर्नाटक ४५.५५, दिल्ली ४५.७३, लडाख ४५.७०, सिक्कीम ४५.६०, हिमाचल प्रदेश ४५.५०, बिहार ४५.२८, झारखंड ४४.८०, नागालँड ४४.५०, त्रिपुरा ४४.४०, तामिळनाडू ४३.६३, दमण आणि दिव ४३.६३,आंध्र प्रदेश ४२.५५, मिझोरम ४३.५०, उत्तर प्रदेश ४३.२५, उत्तराखंड ४२.७०, अरुणाचल प्रदेश ४२.५३, छत्तीसगड ४०.५५, तेलंगणा ३९.५३, दादरा आणि नगर हवेली ३९.२८ आणि मेघालयला ३८.८८ टक्के गुण मिळाले आहेत, अशी माहितीही शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.

गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करणार प्रयत्न ? एनसीईआरटीचा अहवाल नक्कीच चिंताजनक आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत, असे पगारे यांनी सांगितले. या अहवालाची जिल्हावार समीक्षा केली जाणार असून कोणत्या जिल्ह्यात नेमक्या काय अडचणी आहेत हे समजावून घेऊन त्यानूसार गुणवत्ता सुधार कार्यक्रम आखणार आहोत. या पूर्वीच आम्ही निपुण भारत मोहीमेच्या अंतर्गत विविध य़ोजना राबवत आहोत. पालकांनाही विविध गटाच्या माध्यमातून सहभागी करून घेत आहोत, त्यामुळे येत्या वर्षभरात महाराष्ट्राची शैक्षणिक गुणवत्ता सुधारलेली दिसेल, असा दावाही पगारे यांनी केला.

हेही वाचा - Uddhav Thackeray : हृदयस्पर्शी! स्वतःच्या रक्ताने काढले उद्धव ठाकरे यांचे पोर्ट्रेट; कार्यकर्त्याने दिल्या अनोख्या शुभेच्छा

Last Updated : Jul 28, 2022, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.