मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन आणखी वाढविला जाण्याची शक्यता आहे. आज (बुधवार) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल. वाढती रुग्णसंख्या, आरोग्य स्थिती आणि लसीकरण मोहिमेला गती देण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
३१ मे पर्यंत लॉकडाऊन -
मुंबई आणि पुण्यातील कोरोना रूग्ण संख्या कमी होत असली तरी राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. नाशिक, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा या शहरांमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी राज्यात येत्या १५ मे पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हा लॉकडाऊन वाढवणार का निर्बंध हटविले जाणार याची चर्चा असतानाच सध्या लागू असणारा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याची चिन्हे आहेत. आज (बुधवार) मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यावेळी वाढण्याबाबत चर्चा होवून निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच लॉकडाऊन किंवा ब्रेक दि चेनअंतर्गत जे निर्बंध लागू करण्यात आले आहेत ते वाढवायचे की कमी करायचे या सर्व गोष्टींसंदर्भातील निर्णय घेण्यात येतील.
लसीकरणाबाबतही निर्णय होण्याची शक्यता -
दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. तो कमी करून लसीकरण मोहिमेला गती देण्याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. आरोग्य यंत्रणांच्या परिस्थितीवरही चर्चा होणार असल्याचे समजते.
हेही वाचा - मुंबई : महापालिकेने रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटमधील भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले