ETV Bharat / city

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यात कोणाचा दिसणार जोर; दोन्ही गटांसाठी मेळावा प्रतिष्ठेचा, वाचा सविस्तर रिपोर्ट

दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर ( Biggest Revolt in History of Shiv Sena ) शिवसेने उत्साह संचारला आहे. तिकडे शिंदे गटसुद्धा दसरामेळाव्याच्या ( Shiv Sena Dasara Melava 2022 ) तयारीला लागले आहे. शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आलेले असताना, आता गोरेगावला झालेल्या सभेत मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. तर तिकडे न्यायालयातदेखील वाद प्रलंबित असल्याने दोन्ही गटात धाकधूक आहे. त्यामुळे आताचा दसरा मेळाव्यावरून मोठी राजकीय गणिते ठरणार आहेत. जर उद्धव ठाकरे गर्दी खेचण्यात यशस्वी झाले, तर शिंदे गटाचे अस्तित्वाला नक्कीच धक्का पोहचणार आहे

Shiv Sena Dasara Melava 2022
दसरा मेळावा 2022 ठरणार निर्णायक
author img

By

Published : Sep 29, 2022, 2:27 PM IST

मुंबई : मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर शिंदे गटाचे सरकार राज्यात स्थापन झाले. मागील काही महिन्यांपूर्वी मोठ्या राजकीय घडामोडीनंतर भाजप-शिंदे गटाचे ( Shiv Sena Dasara Melava 2022 ) सरकार आले. महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या आमदारांनी बाहेर पडून नवा गट स्थापन केला. शिवसेनेच्या इतिहासातील हे सगळ्यात मोठे ( Biggest Revolt in History of Shiv Sena ) बंड होते. त्यामुळे शिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेला त्यांच्या अस्तित्वासाठी झगडावे लागणार हे नक्की. त्यामुळे येणार शिवसेनेचा दसरा मेळावा हा निर्णायक ठरणार आहे. कारण आता ज्याच्याकडे जास्त शिवसैनिक असणार आहेत, तोच मैदानात बाजी मारणार आहे. पाहूयात यावरील खास रिपोर्ट

यंदाचा दसरा मेळावा निर्णायक असणार : दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. मात्र सुप्रीम कोर्टात सध्या सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात चिंता आणि धाकधूक आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरूनही कार्यकर्त्यांचे मनोगत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. तिकडे शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. कारण दसरा मेळावा दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. उद्धव ठाकरेंनी गोरेगावच्या गटप्रमुखाच्या बैठकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही ज्यांना मोठे केले ते खोक्यात गेले, मी तर अजून घराच्या बाहेर पडलो नाहीये, ज्या क्षणी मी वर्षा सोडून मातोश्रीत आलो तेव्हापासून असे शिवसैनिक मातोश्रीवर येत आहेत. शिवसैनिक बोलले असते तर एक मेळावा इथेच झाला असता, तोही दसरा मेळाव्याच्या कितीतरी पटीने मोठा होईल, असे ठाकरे म्हणाले.

दोन्ही गटांसाठी हा मेळावा असणार प्रतिष्ठेचा : शिंदे गटाचे सरकार झाल्यानंतर आतापर्यंत शिवसेना आणि शिंदे गट यांचा वाद विकोपाल गेल्याचे दिसून येत आहे. दोघेही एकमेकाला कमीपणा दाखवण्याची संधी सोडत नाहीत. शिंदे गटाने आपली शक्ती दाखवायला सुरुवात केल्यानंतर तिकडे उद्धव ठाकरेंनी सुद्धा दंड थोपाटले. त्यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार अशी गर्जना करून, प्रतिआव्हान दिले आहे. दोघांकडूनही आमच्याकडेच शिवसैनिक अधिक जमणार असा दावा केला जात आहे. त्यामुळे कोणाकडे अधिक गर्दी जमणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना आपली शक्ती दाखवायची वेळ आली आहे.

यावरच ठरणार आहेत पुढील राजकीय गणिते : दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यानंतर शिवसेने उत्साह संचारला आहे. तिकडे शिंदे गटसुद्धा दसरामेळाव्याच्या तयारीला लागले आहे. शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आलेले असताना, आता गोरेगावला झालेल्या सभेत मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झाले होते. तर तिकडे न्यायालयातदेखील वाद प्रलंबित असल्याने दोन्ही गटात धाकधूक आहे. त्यामुळे आताचा दसरा मेळाव्यावरून मोठी राजकीय गणिते ठरणार आहेत. जर उद्धव ठाकरे गर्दी खेचण्यात यशस्वी झाले, तर शिंदे गटाचे अस्तित्वाला नक्कीच धक्का पोहचणार आहे. कारण त्यांच्याकडे कोणताही पक्ष नाही. त्यांची बाजू न्यायालयात आहे. त्यांना पक्ष म्हणून कोणत्यातरी पक्षात विलीन व्हावे लागेल. तर इकडे उद्धव ठाकरेंकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे आपल्याकडे लोकांचा ओढा आहे, हे दाखवण्यात दोन्ही गटांची स्पर्धा लागणार आहे.

उद्धव ठाकरेंपुढील आव्हाने : शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, विभागप्रमुख, नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्यात यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंपुढे मोठे आव्हान उभे आहे. त्यातच शिवसेनेसंबंधी वाद न्यायालयात प्रलंबित आहे. शिवसेनेची उभारणी आता पुन्हा नव्याने करणे गरजेचे असताना, त्यांना आपली शक्ती दाखवण्याची वेळ आलेली आहे. दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त शिवसैनिक जमा करून शिवसेनेची ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे.

गटप्रमुखांना जास्तीत जास्त शिवसैनिक जमा करण्याचे आदेश : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांना, शिवतीर्थावर जास्तीत जास्त शिवसैनिक घेऊन येण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. मुंबई शहर परिसरात शिवसेनेचे बारा विभाग प्रमुख आहेत. या विभाग प्रमुखांना महापालिकेच्या 227 प्रभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. एका प्रभागातून किमान चार बसेस भरून शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवर येणे अपेक्षित आहे. म्हणजेच मुंबईतून शिवाजी पार्क सुमारे 900 बसेस येणार आहेत. यासाठी सातत्याने गटप्रमुख शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुख यांच्या बैठका होत आहेत.यंदाचा दसरा मेळावा हा शक्ती प्रदर्शनाचा मेळावा असल्याने त्यासाठी जोरदार तयारी शिवसेनेकडून करण्यात येत आहेत. मुंबईतून किमान 50000 शिवसैनिकांनी हजेरी लावणे अपेक्षित असून ठाणे पालघर नवी मुंबई रायगड आणि उर्वरित महाराष्ट्रातून किमान 50 हजार असे एक लाख शिवसैनिकांचे उद्दिष्ट शिवसेनेने ठेवले आहे. अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

शिंदे गटासमोरील आव्हाने : शिवसेनेचा गोरेगाव येथील गटप्रमुखांच्या मेळाव्याला शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तसेच, उद्धव ठाकरेंनी स्वतः दंड थोपटल्याने, ते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे आता गर्दी कोणाकडे जास्त जमणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच शिवसेने विरुद्ध शिंदे गटाचा वाद न्यायालया प्रलंबित आहे. त्यावर निकाल येणे बाकी आहे. त्यामुळे शिंदे गटाला त्याचीसुद्धा भीती आहे. यामुळे शिवसेनेला शह देण्यासाठी तेवढ्याच ताकदीने बीकेसी येथील मैदानावर शक्तिप्रदर्शन करण्याचा शिंदे गटाने निर्धार केला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवनकर यांनी दिली आहे. त्यासाठी शिंदे गटाकडून राज्य सरकारकडे सुमारे चार हजार 100 एसटी बसेसची मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस उपलब्ध होणे सध्या तरी शक्य दिसत नाही. तसे झाल्यास राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. शिवाय मुंबईत एवढी वाहने पार्क करणे ही शक्य होणार नाही. त्यामुळे शिंदे गटाला आठशे ते हजार गाड्या मिळण्याची शक्यता आहे.

सध्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची? यावरून वाद : आता सध्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची? यावर वाद प्रलंबित असताना, शिवसेनेच्या चिन्हावरच शिंदे गटाने दावा ठोकल्याने शिवसेना पूर्णपणे धोक्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात एवढा मोठा वाद कधीही घडला नव्हता. छगन भुजबळांच्या बंडापासून ते राज ठाकरे, राणेंच्या बंडापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेची पडझड झाली नव्हती. तरीही आता शिंदे गटाच्या आमदारांनी आपआपले समर्थकांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेच, त्यांनी शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, विभागप्रमुख, नगरसेवक आपल्या बाजूने वळवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. दसरा मेळाव्याचे मैदान कोणाला मिळणार यावरून बरेच दिवस वाद चालू होता. आता त्यावर पडदा पडला असताना, दसरा मेळावा दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी मैदानावरून वाद : गेल्या महिन्याभरापासून शिवाजी पार्क कोणाचा हा रखडलेला पेपर मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी देत सोडवला. महापालिकेने अधिकारांचा गैरवापर केला. तर शिंदे गटाच्या याचिकेवर ताशेरे ओढत न्यायालयाने खरडपट्टी काढली. शिवसेनेचा दसरा मेळावा यामुळे शिवाजी पार्कवर होईल. तर फुटीर शिंदे गटाने बीकेसी मैदानात आधीच परवानगी मिळवली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मैदान कार्यकर्त्यांनी भरगच्च करण्याचे आव्हान यावेळी दोन्ही गटाला असणार आहे.

दोन्ही मैदानांची क्षमता पाहूया : शिवाजी पार्क मैदानाची क्षमता ८० हजार ते एक लाख इतकी आहे. तर बीकेसी मैदानाची क्षमता दोन लाख इतकी आहे. शिवाजी पार्कच्या तुलनेत गर्दी जमवण्यासाठी बीकेसी मैदानातील सभा शिंदे गटाला आव्हानात्मक ठरेल. शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे शिवसेनेचीही यंदा गर्दी जमवण्यासाठी मोठी कसरत होत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या गटप्रमुखांचा नुकताच मेळावा झाला. गोरेगाव येथील नेक्सो मैदानात शिवसेनेकडून शक्तीप्रदर्शन केल्याचे संकेत देणारा मेळावा होता. आता शिवाजीपार्क मैदान गर्दीने भरण्यासाठी स्थानिक पदाधिकारी, विभागप्रमुख तसेच आमदारांकडे जबाबदारी असणार आहे. शिंदे गटानेही जोरदार तयारी केली आहे. गल्ली बोळातील मंडळाना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी दोन्हीकडून रस्सीखेच वाढली आहे.

शिंदे गटाकडून 300 एसटीचे बुकिंग : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाडा आणि औरंगाबाद परिसरातून शिंदे गटाच्या शिवसैनिकांना मुंबईत दसरा मेळाव्यासाठी जाण्यासाठी एसटी महामंडळाकडे 300 एसटी बुकिंग करण्याचे मागणी पत्राद्वारे केली आहे. तर आता रायगडाला जाग आली असून रायगडामधूनही हजारो शिवसैनिकांना या दसरा मेळाव्याला आपण आणणार आहोत त्यासाठी व्यवस्था सुरू केली असल्याची माहिती आमदार भरत भोगावले यांनी दिली आहे. जळगावमधून तीन रेल्वे गाड्या बुक करण्यात आल्या असून, एका रेल्वेसाठी सुमारे 25 लाख रुपये खर्च येणार आहे एकूण 75 लाख रुपये या रेल्वे बुकिंग साठी खर्च करण्यात आले आहेत.कोट्यवधी रुपयांचा वाहतूक खर्च - एसटी महामंडळाच्या गाडीचा एक किलोमीटरचा दर 55 रुपये आहे.

शिंदे गटाचे आमदार मराठवाड्यातूनसुद्धा आणणार शिवसैनिक : औरंगाबाद जिल्ह्यातून एक गाडी मुंबईला आणायची असेल तर 400 किलोमीटर अंतर असल्याने एसटीचे एका वेळेचे भाडे 22 हजार रुपये होणार आहे. तर सत्तार यांनी मागणी केलेल्या तीनशे गाड्यांसाठी 66 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता हा आकडा कोट्यवधीमध्ये जाण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवसैनिकांची होणारी आणि गाड्यांची गर्दी पाहता दसऱ्या दिवशी मुंबईत प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याचा ताण कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर येणार असल्याने पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

कोट्यवधी रुपयांचा वाहतूक खर्च : एसटी महामंडळाच्या गाडीचा एक किलोमीटरचा दर 55 रुपये आहे. जर औरंगाबाद जिल्ह्यातून एक गाडी मुंबईला आणायची असेल तर 400 किलोमीटर अंतर असल्याने एसटीचे एका वेळेचे भाडे 22 हजार रुपये होणार आहे. तर सत्तार यांनी मागणी केलेल्या तीनशे गाड्यांसाठी 66 लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता हा आकडा कोट्यवधीमध्ये जाण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवसैनिकांची होणारी आणि गाड्यांची गर्दी पाहता दसऱ्या दिवशी मुंबईत प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याचा ताण कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेवर येणार असल्याने पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.