ETV Bharat / city

घाटकोपरच्या लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल १५ दिवसात वाहतुकीसाठी खुला होणार - राखी जाधव - Bridge

लक्ष्मीबाग नाल्यावरील घाटकोपर आगारा जवळील पूल धोकादायक असल्याने महापालिकेने १८ दिवसापूर्वी बंद केला होता. त्यामुळे घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती, मात्र, हा पूल लवकरच सुरू होणार आहे.

नगरसेविका राखी जाधव पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पुलाची पाहणी करताना
author img

By

Published : Jun 19, 2019, 4:58 AM IST

मुंबई - घाटकोपर पूर्व-पश्चिमला जोडणारा लक्ष्मीबाग नाल्यावरील महापालिकेने बंद केलेला पूल १५ दिवसात वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी दिली. त्या आज या भागात पालिका अधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या.

नगरसेविका राखी जाधव पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पुलाची पाहणी करताना

लक्ष्मीबाग नाल्यावरील घाटकोपर आगारा जवळील पूल धोकादायक असल्याने महापालिकेने १८ दिवसापूर्वी बंद केला होता. त्यामुळे वाहनधारकांना पूर्वेकडून पश्चिम दिशेला येण्यासाठी १०-१२ किलोमीटरचा फेरा पडत होता. तसेच घाटकोपर, चेंबूर, विक्रोळी येथे मोठी वाहतूक कोंडी होत होती, मात्र, हा पूल लवकरच सुरू होणार आहे.

लक्ष्मीबाग नाल्यावरील हा पूल धोकादायक असल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुढचे ४ महिने हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळी जाधव यांनी पालिकेच्या पूल विभाग आणि आयआयटीच्या तपासणी पथकासोबत पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलावरून छोटी वाहने जाण्यासाठी काही तरी उपाययोजना करा, अशी मागणी केली. त्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये पुलाची डागडुजी करून लहान वाहनांसाठी हा पूल खुला केला जाईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आली.

Intro:घाटकोपर पूर्व लक्ष्मीनगर नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी खुला होणार

घाटकोपर पूर्व पश्चिम ला जोडणारा लक्ष्मीबाग नाल्यावरील घाटकोपर आगारा जवळील पूल महानगरपालिकेने धोकादायक असल्याने 18 दिवसापूर्वी बंद केला होता त्यामुळे वाहनधारकांना पूर्व पश्चिम दिशेला येण्यासाठी दहा ते बारा किलोमीटरचा फेरा पडत होता त्यामुळे घाटकोपर, चेंबूर ,विक्रोळी येथे मोठी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती.Body:घाटकोपर पूर्व लक्ष्मीनगर नाल्यावरील पूल वाहतुकीसाठी खुला होणार

घाटकोपर पूर्व पश्चिम ला जोडणारा लक्ष्मीबाग नाल्यावरील घाटकोपर आगारा जवळील पूल महानगरपालिकेने धोकादायक असल्याने 18 दिवसापूर्वी बंद केला होता त्यामुळे वाहनधारकांना पूर्व पश्चिम दिशेला येण्यासाठी दहा ते बारा किलोमीटरचा फेरा पडत होता त्यामुळे घाटकोपर, चेंबूर ,विक्रोळी येथे मोठी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती.

आज महानगरपालिका पूल विभाग तसेच आयआयटीच्या तपासणी पथक व स्थानिक नगरसेविका राखी जाधव यांनी लक्ष्मीबाग नाल्यावरील बंद केलेल्या धोकादायक पुलाची आज पाहणी केली व हा पूल लहान वाहनासाठी सुरु करण्यासाठी आय आय टी चा सकारात्मक आलेला अहवाल व पूल विभागाचे वाहतूक समस्या कमी करण्याचे प्रयत्नामुळे हा बंद केलेला पूल छोट्या वाहनासाठी लवकरच खुला करण्यात येणार असून या पुलाची डागडुजी करून तो 15 दिवसात छोट्या वाहनासाठी वाहतुकीसाठी खुला होणार आहे.त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

राखी जाधव स्थानिक नगरसेविका

लक्ष्मीबाग नाल्यावरील हा पूल धोकादायक असल्याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्तांना भेटलो पुढचे चार महिने पावसाळ्यामध्ये हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. तर यावर छोटे वाहन चालवता येतील का यावर काही उपाययोजना करा अशी आम्ही त्यांना मागणी केली त्यावेळी पालिकेच्या पूल विभाग व आयआयटीच्या तपासणी पथक यांसोबत आज सकाळी पुलाची पाहणी केल्यानंतर त्या पुलावर आज पासुनच कामाला सुरुवात झाली आहे तो उद्यापासून दगडुजीचे काम चालू होऊन येत्या 15 दिवसांमध्ये निश्चितच लहान वाहनांसाठी हा लक्ष्मीबाग नाल्यावरील पूल खुला केला जाणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.