ETV Bharat / city

Lata Mangeshkar health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृती जैसे थे, रुग्णालया बाहेर बंदोबस्त वाढवला - लता मंगेशकर प्रकृती अपडेट

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.त्या अजूनही आयसीयु मध्ये माझ्या देखरेखीखाली आहेत असे ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ प्रतित समदानी यांनी सकाळी स्पष्ट केले आहे. दरम्यान रुग्णालयात मान्यवर भेट देत आहेत. या पार्श्वभुमीवर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Lata Mangeshkar health  update
लता मंगेशकर
author img

By

Published : Feb 5, 2022, 1:46 PM IST

Updated : Feb 6, 2022, 9:15 AM IST

मुंबई - भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती खालावली होती. त्यांना त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ( Lata Mangeshkar On The Ventilator ) ठेवण्यात आले होते. आता लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती येत आहे. त्या उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांंनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत आहेत. दिदींची तब्येतीत हळूहळू सुधारणा होत असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. पण प्रकृती पुन्हा खालवत असल्याने आज त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर सपोर्ट देण्यात आला आहे.

  • "Singer Lata Mangeshkar continues to be in ICU & is under my supervision: Dr Pratit Samdani, who is treating her at Mumbai's Breach Candy Hospital

    For the last 29 days, singer Lata Mangeshkar has been admitted to Breach Candy Hospital in Mumbai

    (file photo) pic.twitter.com/LE8OFdlWHS

    — ANI (@ANI) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हॉस्पिलटमध्ये जाऊन अनेकांनी केली लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आशा भोसले हॉस्पिटलमध्ये आल्या आहेत. लतादीदींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करते, असे आशा भोसले म्हणाल्या. तर रश्मी ठाकरे, सुप्रिया सुळे, मंगल प्रभात लोढा, पियुष गोयल यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन लतादीदींच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.

आठवड्यापूर्वीच झाल्या कोरोनामुक्त

लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनिया झाला होता, मात्र आठवडाभरापूर्वीच त्या कोरोनामुक्त झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. याआधीही नोव्हेंबर 2019 मध्ये लतादीदींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना न्युमोनियाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना 28 दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

भारतरत्न लतादीदींच्या आरोग्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. मात्र अशा अफवा कुणीही पसरवू नयेत. लता दीदींवर अतिदक्षता विभागात डॉ. प्रतीत समदानी आणि त्यांच्या टीममधील डॉक्टर्स उपचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि त्यांना रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज मिळावा, यासाठी सर्वांनी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लतादीदींच्या प्रकृतीसाठी अयोध्येत महामृत्यूंजय मंत्र

लतादीदींच्या प्रकृतीसाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. त्या लवकरात लवकर बरे व्हाव्यात यासाठी अयोध्येत महामृत्यूंजय मंत्राचा जप करण्यात आला होता. यावेळी तिथल्या महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकरांची भेट घ्यावी, अशी मागणी केली होती. अयोध्येतील आचार्य पीठाच्या तपस्वी छावणीत महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. महायज्ञ तपस्वी पीठाचे पीठाधीश्वर जगद्गुरू परमहंस आचार्य यांच्या नेतृत्वाखाली होम करण्यात आले होते. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे घालून महाआरती केली होती.

हेही वाचा - Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा - रुग्णालय प्रशासन

Last Updated : Feb 6, 2022, 9:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.