ETV Bharat / city

POD HOTELS RATE जाणून घ्या, मुंबईत सुरू झालेल्या देशातील पहिल्या पॉड हॉटेलचे दर - मुंबई पॉडेल हॉटेल सुविधा

पॉड हॉटेलच्या प्रत्येक रुममधील प्रवाशांना (Services in Mumbai Pod Hotel) लगेज रुम, टॉयलेटरीज, शॉवर रूम, वॉशरूम सर्वांसाठी एकाच ठिकाणी सामायिक आहे. तर प्रत्येक पॉड रुममध्ये प्रवाशांना टीव्ही, छोटे लॉकर्स, आरसे, एडजस्टेबल एअर कंडिशनर आणि एअर फिल्टर, रीडिंग लाइट्स यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. हॉटेलचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे आहेत.

POD HOTELS RATE
POD HOTELS RATE
author img

By

Published : Nov 18, 2021, 5:40 PM IST

मुंबई- जपानच्या धर्तीवर मुंबई सेंट्रल स्थानकांवर प्रवाशांना विश्रांतीसाठी संपूर्ण सुखसोयींनी सुसज्ज असलेले देशातील पहिले 'पॉड हॉटेल प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. हे दर मुंबईतील महागड्या हॉटेलच्या तुलनेने कमी आहेत.

रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणजे जपानच्या धर्तीवर देशातील पहिले पॉड हॉटेल मुंबई सेंट्रल स्थानकावर ( pod hotel at Mumbai Central railway station) सुरू करण्यात आले आहे. या ‘पॉड हॉटेलची निर्मिती इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशनकडून करण्यात आली आहे. हे हाॅटेल सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये राहणार असून सुखसोईंनी सूसज्ज अशा छोट्या आकारांतील हॉटेल असणार आहे. या पॉड हॉटेलमध्ये ३० खोल्या आहे. हॉटेल सुरू झाल्यानंतर १२ तासांसाठी प्रवाशांना या खोल्या भाड्याने देण्यात येणार आहे. सध्या १२ तासांसाठी प्रति प्रवासी १ हजार दर आकारणार असल्याची माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा-"कंगनाचे समर्थन हा मुर्खपणा, यापुढे विक्रम गोखलेंसोबत काम करणार नाही"

असे आहेत पॉड हॉटेलचे दर

पॉड हॉटेलचे दर (Pod Hotel rate in Mumbai) 12 तासांसाठी 999 रुपये प्रति व्यक्ती आहेत. तर 24 तासांसाठी 1, 999 रुपये प्रति व्यक्ती दर आहेत. तर प्रायव्हेट पॉडसाठी 12 तासांना 1249 रुपये तर 24 तासांना 2499 रुपये मोजवे लागतील. महत्त्वाचे म्हणजे या हॉटेलमध्ये चप्पल, शूज घालून जाता येणार नाही. तसेच, जेवणदेखील बाहेरून खाऊन यावे लागणार आहे.

हेही वाचा-हुंड्यासाठी मुलीची छळवणूक, वडिलांची आत्महत्या; मुलीनेही ठेवला वडिलांशेजारी देह

या मिळणार सुविधा-

पॉड हॉटेलच्या प्रत्येक रुममधील प्रवाशांना (Services in Mumbai Pod Hotel) लगेज रुम, टॉयलेटरीज, शॉवर रूम, वॉशरूम सर्वांसाठी एकाच ठिकाणी सामायिक आहे. तर प्रत्येक पॉड रुममध्ये प्रवाशांना टीव्ही, छोटे लॉकर्स, आरसे, एडजस्टेबल एअर कंडिशनर आणि एअर फिल्टर, रीडिंग लाइट्स यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. सोबत अंतर्गत दिवे, मोबाईल चार्जिंग, स्मोक डिटेक्टर, डीएनडी इंडिकेटरची सोयदेखील आहे.

हेही वाचा-Jayant Patil on Param Bir Singh : मदत केल्याशिवाय परमबीर सिंग देशाबाहेर जाऊ शकत नाहीत - जयंत पाटील

1 कोटी 80 लाख रुपये खर्चून बांधण्यात आले पॉड हॉटेल

मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकांवर सुरु करण्यात आलेल्या पॉड हॉटेलला अंदाजे 1 कोटी 80 लाखांचा खर्च (construction price of Mumbai Pod Hotel) आलेला आहे. लांब पल्लांच्या गाड्यांतून प्रवास करून आलेल्या किंवा उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्या तात्पुरती राहण्याची सोय पॉड हॉटेलमुळे होणार आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत आधुनिक डिझाईनचे हे पॉड हॉटेल आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.