ETV Bharat / city

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल १२ दिवस राहणार बंद; पुलाचे सांधे भरण्याचे काम होणार - Mumbai Metropolitan Region Development Authority

जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाण पुलाच्या विविध ठिकाणी सांधे उभारण्यासाठी तब्बल १२ दिवस उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे. सांधे भरण्याचे काम १३ मे २०२२ ते २४ मे २०२२ दरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना शुक्रवारपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

Jogeshwari-Vikroli Link Road flyover will be closed for 12 days
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड उड्डाणपूल १२ दिवस बंद राहणार
author img

By

Published : May 8, 2022, 3:03 PM IST

मुंबई - जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड उड्डाण पुलाच्या ( Jogeshwari-Vikroli Link Road flyover ) विविध ठिकाणी सांधे उभारण्यासाठी तब्बल १२ दिवस उड्डाणपूल बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (Mumbai Metropolitan Region Development Authority ) घेतला आहे. सांधे भरण्याचे काम १३ मे २०२२ ते २४ मे २०२२ दरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना शुक्रवारपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

पुलाखालून वाहतूक सुरू राहणार- जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) उड्डाण पुलाच्या ( Jogeshwari-Vikroli Link Road flyover ) विभिन्न भागांतील सांधे भरण्याचे काम १३ ते २४ मे दरम्यान केले जाणार आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल १२ दिवस बंद राहणार आहे. या कालावधीत वाहतूक वळविण्यात येणार असून रस्त्यावर कोंडी होण्याची शक्यता आहे. पण, या कालावधीत पुलाखालून वाहतूक सुरू राहणार आहे. या उड्डाणपुलाच्या २०० बेअरींग बदलण्यासह एक्सपान्शन जॉइंट अर्थात दोन स्पॅनमधील सांधे बदलण्याचे काम तीन महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. वाहतूक बंद न करता बेअरींग बदलण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत २०० पैकी १४८ बेअरींग बदलण्यात आले आहे. जितके बेअरींग बदलण्यात आले आहेत, त्या भागातील सांधे बदलण्यात येतील. या कामासाठी मात्र उड्डाणपूल बंद ठेवावा लागणार आहे.

हेही वाचा : BMC BEST Service : सेवा सुविधा आणि डिजिटलायझेशनमुळे बेस्टची प्रवाशी संख्या वाढली, महसुलातही वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.